Morning Health : सकाळी उठल्यावर तोंडाला कडू चव का येते? फक्त रात्रीचे जेवणच नाही, तर लपली आहेत 'ही' ५ कारणेही

Shreya Maskar

सकाळी उठल्यावर तोंडाला कडू चव

सकाळी झोपेतून उठल्यानंतर तोंडाला कडू चव येणे, तोंड कोरडे पडणे किंवा विचित्र चव जाणवणे ही अनेकांना जाणवणारी समस्या आहे. यामागचे नेमकं कारण जाणून घेऊयात.

Bitter Taste In Mouth Morning | pinterest

तोंड कोरडे पडणे

झोपताना लाळेचे प्रमाण नैसर्गिकरीत्या कमी होते. तोंड उघडे ठेवून झोपणे, घोरणे किंवा शरीरात पाण्याची कमतरता असणे यामुळे तोंड अधिक कोरडे पडू शकते.

Dry mouth | pinterest

अ‍ॅसिड रिफ्लक्स

पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर आल्यास तोंडात आंबट किंवा कडवट चव येऊ शकते. रात्री उशिरा जेवणे, जेवल्यानंतर लगेच झोपणे आणि काही पदार्थ खाल्ल्यानंतर हा त्रास वाढू शकतो.

Acid reflux | pinterest

दात- हिरड्यांचे आजार

दातांवर साचलेला प्लाक, हिरड्यांची सूज, दात किडणे किंवा तोंडातील संसर्ग यामुळे तोंडाची चव बदलू शकते. तोंडाला दुर्गंधी येत असल्यास दात आणि हिरड्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.

Diseases of the teeth and gums | pinterest

जीभ स्वच्छ न ठेवणे

जिभेवर अन्नाचे सूक्ष्म कण, मृत पेशी आणि बॅक्टेरिया साचल्याने तोंडाला दुर्गंधी आणि विचित्र चव येऊ शकते. त्यामुळे दात घासण्यासोबत जीभही हलक्या हाताने स्वच्छ करावी.

tongue | pinterest

नाक बंद होणे

सर्दी, नाक बंद होणे किंवा सायनसच्या समस्यांमुळे वास घेण्याची क्षमता बदलू शकते. वास आणि चव यांचा जवळचा संबंध असल्यामुळे सकाळी अन्नाची किंवा तोंडाची चव वेगळी जाणवू शकते.

Nasal congestion | pinterest

धूम्रपान

धूम्रपान, मद्यपान आणि तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे तोंड कोरडे पडणे, दुर्गंधी येणे आणि चव बदलणे अशा समस्या उद्भवू शकतात.

smoking | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : दिवसातून किती वेळा फेसवॉशने चेहरा धुवावा? ग्लोइंग स्किनसाठी फेसवॉश किती वापरावा?

Face Wash | AI PHOTO
येथे क्लिक करा...