Shreya Maskar
चेहऱ्याची त्वचा स्वच्छ, मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी फेसवॉशचा वापर केला जातो. मात्र, चेहरा धुताना अनेकजण सहज या तीन चुका करतात, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते.
दिवसातून अनेक वेळा फेसवॉश वापरल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊ शकते. त्यामुळे त्वचा कोरडी आणि संवेदनशील होण्याची शक्यता असते.
चेहरा स्वच्छ करण्यासाठी स्क्रब किंवा रफ टॉवेलचा अतिवापर करू नका. यामुळे त्वचेवर जळजळ आणि लालसरपणा वाढू शकतो.
प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्वचा कोरडी असल्यास मॉइश्चरायझिंग आणि संवेदनशील असल्यास सुगंधविरहित सौम्य फेसवॉश निवडणे फायदेशीर ठरू शकते.
सामान्यतः दिवसातून दोन वेळा सकाळी आणि रात्री चेहरा धुणे पुरेसे असते. मात्र, त्वचेचा प्रकार, हवामान आणि घाम यानुसार ही गरज बदलू शकते.
अधिक फेसवॉश वापरल्याने चेहरा अधिक स्वच्छ होतो असे नाही. उत्पादनाच्या सूचनांनुसार योग्य प्रमाण वापरा आणि चेहरा व्यवस्थित धुवा.
चेहरा कोमट पाण्याने ओला करा. योग्य प्रमाणात फेसवॉश घ्या. हलक्या हाताने मसाज करा. स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. मॉइश्चरायझर लावा
फेसवॉश केल्यावर न विसरता मॉइश्चरायझर लावा. जेणेकरून त्वचा मऊ आणि तजेलदार राहील. विशेषतः कोरड्या त्वचेसाठी चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावणे महत्त्वाचे आहे.