Shreya Maskar
नोव्हेंबर महिना म्हणजे पर्यटनासाठी उत्तम काळ! पावसाळा संपलेला असतो, हवामान आल्हाददायक असते आणि अनेक ठिकाणी निसर्गाचे सौंदर्य खुलून दिसते. तुम्हीही थंडगार वातावरणात फिरण्याचा प्लान करा.
हिमाचल प्रदेशात मनाली हे ठिकाण वसलेले आहे. डोंगराळ प्रदेशात फिरण्याची इच्छा असल्यास मनाली हा एक उत्तम पर्याय आहे. उंच पर्वतरांगा, देवदाराची जंगले, बियास नदी आणि थंडगार हवामान यामुळे मनाली पर्यटकांना आकर्षित करते.
समुद्रकिनारे, नारळाची झाडे, पोर्तुगीजकालीन वास्तू, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि सूर्यास्ताचा आनंद यामुळे गोवा पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. गोव्याला गेल्यावर बागा बीच, पालोलेम बीच, फोर्ट अग्वाडा पाहायला नक्की जा.
तुम्हाला जर जंगल सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाला भेट द्या. हे ठिकाण उत्तराखंड येथे आहे. घनदाट जंगल, नद्या, गवताळ प्रदेश आणि विविध प्रकारचे वन्यजीव यामुळे येथे निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी मिळते.
वाराणसी उत्तर प्रदेशात वसलेले आहे. गंगा नदीच्या काठावरील घाट, मंदिरांची परंपरा, गंगा आरती आणि जुन्या शहरातील गल्ल्या या शहराची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
मुन्नार हे ठिकाण चहाचे मळे आणि हिरव्यागार डोंगररांगासाठी प्रसिद्ध आहेत. हे केरळमध्ये वसलेले आहे. हिरव्यागार चहाच्या मळ्यांनी व्यापलेले डोंगर, धुक्याने वेढलेले रस्ते आणि थंडगार वातावरण यामुळे हे ठिकाण विशेष आकर्षक दिसते.
काश्मीरला गेल्यावर दल सरोवर आणि निगेन सरोवराला नक्की भेट द्या. ही ठिकाणे श्रीनगरमधील पारंपारिक लाकडी शिकार, तरंगत्या बागा आणि आलिशान हाऊसबोटसाठी प्रसिद्ध आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.