Parineeti Chopra-Raghav Chadha Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pariniti Chopra: ‘तुम्ही राजकारणाविषयी प्रश्न विचारा...’ राघव चड्ढा परिणीती विषयी जरा स्पष्टच बोलले

राघव चड्ढा आज मुलाखतीत परिणीती चोप्रा विषयी जरा स्पष्टच बोलले.

Chetan Bodke

Parineeti Chopra-Raghav Chadha: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पक्षाचे नेते फहद अहमद यांनी काही दिवसांपूर्वीच लगीनगाठ बांधली. तसं बॉलिवूड आणि राजकारणांच नातं काही लपून राहिलेलं नाही. आता अशीच आणखी एक जोडी चर्चेत आहे. आपचे खासदार राघव चड्ढा आणि बॉलिवूड आभिनेत्री परिणिती चोप्राचे काही मुंबईतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल आहेत.

राघव चड्ढा याआधी परिणीती चोप्रासोबत अनेकदा डिनरसाठी एकत्र गेले होते.अशातच गुरुवारी अर्थात काल पुन्हा एकदा 'लंच डेट'साठी एकत्र भेटले होते. दोघांनी पहिल्यांदा मुंबईतील गोरेगाव परिसरातील वेस्टिन हॉटेलमध्ये एकत्र डिनर केलं होतं. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्याही रिलेशनच्या सध्या चर्चा होत आहे.

आपचे खासदार राघव चड्ढा यांनी एका हिंदी संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, “ मला तुम्ही राजकारणाविषयी प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल नाही.” सध्या या दोघांचाही भेटीचा उद्देश अद्याप कळू शकलेला नाही, परिणीतीच्या टीमला विचारणा करूनही अद्याप माहिती मिळालेली नाही.

व्हायरल व्हिडिओमध्ये राघव चढ्ढा त्याच्या कारमध्ये बसलेला दिसतो, तर परिणीती काळ्या रंगाच्या कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसत आहे. तो रेस्टॉरंटमध्ये उभ्या असलेल्या पापाराझींसोबत बोलताना दिसत आहे आणि नंतर कारमध्ये बसतो. यावेळी राघव चढ्ढा यांनी फॉर्मल शर्ट आणि पँट घातली होती. राघव चढ्ढा हे पंजाबचे राज्यसभेचे सर्वात तरुण सदस्य आहेत.

परिणीती चोप्रा ही प्रियांका चोप्रा जोनसची चुलत बहीण आहे. 2011 पासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. परिणीती चोप्राने तिच्या १२ वर्षांच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत 'इशकजादे', 'लेडीज वर्सेस रिकी बहल', 'शुद्ध देसी रोमान्स', 'हसी तो फसी', 'गोलमाल अगेन' आणि 'संदीप और पिंकी फरार' सारखे चित्रपट केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

Building Collapsed : मुंब्र्यात मध्यरात्री दुर्घटना, २५ वर्ष इमारतीचा सज्जा कोसळला, महिलेचा जागीच मृत्यू

GST Reforms: प्रत्येक घराघरात वापरणाऱ्या १५ वस्तू, १० दिवसांत होणार स्वस्त, सगळी यादी एका क्लिकवर

गृहमंत्र्यांचा राजीनामा, २१ जणांचा मृत्यू अन् सोशल मीडियावरील बंदी उठली, नेपाळमध्ये Gen-Z चं आंदोलन मागे

Lal Mathachi Bhaji Recipe : लाल माठाची भाजी आरोग्याला ठरेल फायदेशीर, नेहमी रहाल हेल्दी अन् फिट

SCROLL FOR NEXT