Anant- Radhika 2nd Pre Wedding Photos Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant- Radhika 2nd Pre Wedding : अनंत- राधिका यांचे दुसऱ्या प्री- वेडिंगमधील रोमँटिक फोटो व्हायरल, पोजेसची होतेय चर्चा

Anant- Radhika 2nd Pre Wedding Photos : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग इव्हेंटला बराच काळ लोटून गेला असला तरी हे फंक्शन अजूनही चर्चेत आहे.

Chetan Bodke

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग इव्हेंटला बराच काळ लोटून गेला असला तरी हे फंक्शन अजूनही चर्चेत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनंत आणि राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग फंक्शन फ्रान्स ते इटली एका क्रूझवर आयोजित केले होते. सध्या सोशल मीडियावर अनंत- राधिकाचे प्री- वेडिंगमधील अनेक लूक समोर आले आहेत. ४ दिवस चाललेल्या या क्रूझ पार्टीमध्ये वधू- वरांनी प्रत्येक लूक खूप खास बनला होता.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं दुसरं प्री-वेडिंग फंक्शन झाले. सध्या त्या इव्हेंटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या दोघांचेही प्री-वेडिंगमधील अनेक फोटोज् सध्या व्हायरल होत आहेत. यावेळी नववधू राधिका मर्चंट वेगवेगळ्या ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. राधिकाच्या एका ड्रेसवर लव्ह लेटरची डिझाईन असलेली पाहायला मिळाली. प्री वेडिंग इव्हेंटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राधिकाने लूक कॅरी केलेला होता.

इव्हेंटमध्ये राधिकाने तीन वेगवेगळ्या प्रसिद्ध डिझायनर्सने डिझाईन केलेले आऊटफिट कॅरी केलेला होता. यावेळी वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत होती. या लूकमध्ये राधिकाने कॅमेऱ्यासमोर अप्रतिम पोजेस दिल्या होत्या. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तारीखही जाहीर झाली आहे. अनंत- राधिका यांच्या लग्नसोहळ्याची सुरूवात १२ जुलैपासून होणार आहे. शनिवारी, १३ जुलै रोजी हा नव दाम्पत्याला शुभ- आशिर्वादाचा कार्यक्रम असेल. तर रविवारी, १४ जुलै लग्नाचा ग्रँड रिसेप्शन सोहळा असणार आहे. हा संपूर्ण लग्नसोहळा हिंदू वैदिक पद्धतीने पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT