Radhe Maa Son OTT Debut Saam TV
मनोरंजन बातम्या

Radhe Maa Son OTT Debut: राधे माच्या मुलाची अभिनय क्षेत्रात एन्ट्री; रणदीप हुड्डासोबत ओटीटीवर केली सुरूवात

Randeep Hooda- Harjinder Singh: राधे माँच्या मुलाचे नाव हरजिंदर सिंह आहे.

Pooja Dange

Inspector Avinash Radhe Maa Sons 1st Web Series: राधे माँ हे वादग्रस्त व्यक्तिमत्व तुम्हाला माहीत असेलच. स्वतःला राधेचा अवतार म्हणवणारी राधे माँ तिच्या शिष्यांना तिची पूजा करायला लावते. राधे माँ बिग बॉस-14 मध्येही सहभागी झाली होती. पूजेच्या नावाखाली होणाऱ्या अनेक कार्यक्रमांमध्ये ती बेधुंदपणे नाचतानाही दिसते. राधे माँला एक मुलगा देखील आहे. राधे माँचा मुलगा सध्या काय करतोय याविषयी कोणाला फारसे माहीत नाही. चला आज जाणून घेऊया त्याच्याविषयी.

राधे माँच्या मुलाचे नाव हरजिंदर सिंह आहे. तो एक अभिनेता आहे आणि त्याने काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तो ओटीटीवर रणदीप हुड्डासोबत 'इन्स्पेक्टर अविनाश'मध्ये काम करत आहे. JioCinema ची ही नवीन मालिका आहे, ज्यामध्ये हरजिंदर आणि रणदीप हुड्डा एकत्र काम करताना दिसणार आहेत. (Latest Entertainment News)

हरजिंदर सिंगला चित्रपटसृष्टीला त्याचा भूतकाळ कोणाला कळू द्यायचा नाही. राधे माँचा मुलगा अशी ओळख व्हावी असे त्याला वाटत नाही. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हरजिंदरला त्याची ओळख त्याच्या कामातून आणि वर्तनातून बनवायची आहे. यासाठी ते कठोर परिश्रम घेत आहेत आणि एक दिवस तो त्याचे ध्येय गाठेल.

हरजिंदर सिंग त्याच्या करियरविषयी म्हटले आहे की, 'राधे माँ माझी आई आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आईच्या नावाचा आधार घेऊन मी जर चित्रपटसृष्टीत आलो असतो तर लोकांना वाटले असते की मी संघर्ष करू शकत नाही, म्हणून मी माझ्या आईच्या नावाचा वापर केला नाही.

पण आता स्वत:च्या बळावर चित्रपटसृष्टीत एक पाऊल पुढे टाकताना लोक म्हणतात की मी खूप मेहनत करते. मी 2013 साली माझ्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि आजपर्यंत मी खूप मोठा पल्ला गाठला आहे.

'इन्स्पेक्टर अविनाश' ही एक थरारक अॅक्शन वेबसीरीज आहे. ज्यामध्ये रणदीप हुड्डा इन्स्पेक्टर अविनाशच्या भूमिकेत आहे, तर हरजिंदर त्याच्या सहकाऱ्याच्या भूमिकेत आहे. ही मालिका रिअल लाईफ इन्स्पेक्टर अविनाश मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या गुन्ह्याविरुद्धच्या ऑपरेशनवर आधारित आहे.

नीरज पाठक यांनी ही वेबसीरीज लिहिली आहे आणि तेच दिग्दर्शनही करत आहेत. रणदीप हुड्डा आणि हरजिंदर सिंग यांच्याशिवाय या मालिकेत उर्वशी रौतेला, अमित सियाल, अभिमन्यू सिंग, शालीन भानोत, फ्रेडी दारूवाला, राहुल मित्रा आणि अध्यायन सुमन यांच्याही भूमिका आहेत. १८ मेपासून जिओ सिनेमावर ही वेबसीरीज सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT