HBD Jr NTR: साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचे टॉप ६ चित्रपट आवर्जून पाहा

Best Movie Of Jr NTR: ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त पाहूया त्याच्या बेस्ट ६ चित्रपटांची यादी.
Jr NTR Best Movie
Jr NTR Best Movie Instagram @jrntr

Jr NTR Movies List: ज्युनिअर एनटीआरने त्याच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत त्याचे अढळ स्थान निर्मण केले आहे. बालकलाकार म्हणून त्याने अभिनय करायला सुरूवात केली. ज्युनिअर एनटीआर आता तेलुगु चित्रपट सृष्टीतील बड्या स्टारपैकी एक आहे. पॉवरफुल कलाकारांमध्ये ज्युनिअर एनटीआरची गणना केली जाते.

ज्युनिअर एनटीआरला त्याच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यामुळे आणि त्याच्या कामाप्रती त्याचे असलेले समर्पण यामुळे त्याने खूप मोठा चाहते वर्ग कमवला आहे. ज्युनिअर एनटीआरने अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत. ज्युनिअर एनटीआरने त्याच्या अष्टपैलुत्व आणि चर्मने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. आज त्याच्या ४०व्या वाढदिवस आहे. ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त पाहूया त्याच्या बेस्ट ६ चित्रपटांची यादी. (Latest Entertainment News)

Jr NTR Best Movie
Jr NTR-Janhvi Kapoor Movie First Look: ज्युनियर एनटीआर-जान्हवी कपूरच्या चित्रपटाचे नाव ठरलं; फर्स्ट लूक प्रदर्शित

आरआरआर

आरआरआर या चित्रपटाला वेगळ्या परिचयाची गरज नाही. एसएस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे. भारतातील दोन स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध केलेल्या उठावावर हा चित्रपट आधारित आहे.

स्टूडेंट नंबर १

एसएस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेले या चित्रपटाचे कथानक आदित्य (ज्युनियर एनटीआर) ला फॉलो करतो. आदित्य त्याच्या वडिलांच्या आग्रहावरून लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतो. अभियंता बनणे ही त्याची महत्त्वाकांक्षा असूनही त्याचे वैयक्तिक जीवन आणि त्याच्या संस्थेतील अनेक गोष्टींमुळे त्याला अनेक अडचणी येतात.

सिंहाद्री

ज्युनिअर एनटीआर आणि एसएस राजामौली यांचा एकत्र आणि बॉक्स ऑफिसवर हिट झालेला हा चित्रपट होता. हे कथानक सिंहाद्रीच्या कथेवर आधारित आहे. सिंहाद्रीचे संगोपन वर्मा कुटुंबाने स्वतःचे मूळ म्हणून केले असते. जेव्हा तो त्याच्या जीवनातील प्रेमासोबत जाण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्याच्या आयुष्याला वेगळं वळण मिळतं. या चित्रपटात भूमिका चावला आणि अंकिता यांच्याही भूमिका आहेत.

बादशाह

या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीनू वैतला यांनी केले होते आणि काजल अग्रवाल ज्युनियर एनटीआरसोबत मुख्य भूमिकेत होते. हे कथानक रामाराव यांच्या जीवनाभोवती फिरते, ज्याला त्याच्या वडिलांच्या गुन्हेगाराशी संबंध असल्यामुळे पोलीस खात्यात नोकरी मिळवता येत नाही. तथापि, कथेतील ट्विस्टनंतर रामारावला गुंड बनणे भाग पडते.

टेम्पर

पुरी जगन्नाध दिग्दर्शित, चित्रपटाचे कथानक दया नावाच्या एका भ्रष्ट पोलिसाभोवती फिरते, जो स्थानिक गुंडाशी हात मिळवून त्यांना अवैध व्यवसाय करण्यास मदत करतो. जेव्हा तो शान्वी (काजल अग्रवाल) च्या प्रेमात पडतो तेव्हा त्याचे जीवन बदलते. ती त्याला धार्मिकतेच्या मार्गाकडे नेते. 2015 चा हा चित्रपट जूनियर एनटीआरचा सर्वोत्तम कामगिरी असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.

जनता गेराज

हा चित्रपट आनंद या पत्रावर आधारित आहे. आनंद एक पर्यावरण रक्षक असतो जो सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी हैदराबादला जातो. समाजात पिळवणूक होत असलेल्या लोकांसही काम करणाऱ्या सत्यम जेव्हा आनंद भेटतो तेव्हा त्याच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. या चित्रपटात सामंथा रुथ प्रभू, मोहनलाल आणि नित्या मेनन यांच्याही भूमिका आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com