R Madhavan posts pic with PM Modi and French President Instagram @actormaddy
मनोरंजन बातम्या

R Madhavan In Paris :डिनर पार्टीत PM मोदींसोबत पोज देत होता आर माधवन, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी क्लिक केला सेल्फी

R Madhavan Share Post : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ डिनरचे आयोजन केले होते.

Pooja Dange

R Madhavan Attended Dinner With PM Modi :बॉलिवूड अभिनेता आर माधवन त्याच्या चित्रपटांबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतो. अलीकडे, अभिनेता पॅरिसमधील बॅस्टिल डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला होता.

14 जुलै 2023 रोजी पॅरिसमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आर माधवनसाठी हा कार्यक्रम खूप खास होता. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ डिनरचे आयोजन केले होते.

हे डिनर खास पीएम मोदींसाठी ठेवण्यात आले होते. पण या डिनरला आर माधवनलाही आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगाचे अनेक फोटो स्वत: आर माधवनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. (Latest Entertainment News)

याशिवाय, त्याने त्याच्या अद्भुत संध्याकाळची आठवण करून देणारी एक हृदयस्पर्शी पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टमधून आर माधवनने पीएम मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे कौतुक केले आहे.

आर माधवनने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने पीएम मोदींचा हात धरल्याचे दिसत आहे. त्याचवेळी पीएम मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन जेवणाच्या टेबलावर बसलेले दिसत आहेत. काही फोटोंमध्ये सर्वजण सेल्फी काढताना दिसत आहे.

अभिनेत्याने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. ही छायाचित्रे शेअर करताना त्यांनी लिहिले की, 14 जुलै 2023 रोजी पॅरिसमध्ये झालेल्या बॅस्टिल डे सेलिब्रेशनमध्ये भारत-फ्रान्स संबंध तसेच दोन्ही देशांतील लोकांसाठी चांगले करण्याची तळमळ आणि समर्पण स्पष्ट आणि प्रखर होते.

अभिनेत्याच्या पोस्टनुसार, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लूवर येथे आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या डिनरमध्ये, दोन्ही जागतिक नेत्यांनी या दोन महान मैत्रीपूर्ण राष्ट्रांच्या भविष्यासाठी त्यांचे व्हिजन मांडले.

आर माधवन यांनीही पीएम मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे कौतुक केले असून दोघांचेही आभार मानले आहेत. यासोबतच अभिनेत्याने दोन्ही देशांच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल लिहिले आहे. आर माधवनच्या पोस्टवर नेटकरी लाईक वर्षाव करत आहेत. आर माधवनच्या पोस्टमधील पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची वागणे आश्चर्यचकित करणारे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

SCROLL FOR NEXT