Dhurandhar 2  saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2 : 'धुरंधर २' विरोधात FIR दाखल; VIDEO शेअर करत आर. माधवननं दिलं स्पष्टीकरण, म्हणाला-"मैंने सिगरेट..."

R Madhavan Video : बॉलिवूड अभिनेता आर. माधवने एक व्हिडीओ शेअर करून चित्रपटातील 'त्या' सीनवर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच त्याने सर्वांची माफी देखील मागितली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'धुरंधर 2' चित्रपट 19 मार्च 2026ला रिलीज झाला.

'धुरंधर २' विरोधात FIR दाखल करण्यात आले आहे.

आर. माधवने व्हिडीओ शेअर करून 'त्या' सीनवर स्पष्टीकरण दिले.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. तर दुसऱ्या बाजूला 'धुरंधर 2' वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील एका सीनमुळे शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

चित्रपटातील एका सीनमध्ये माधवनचे पात्र हातात सिगारेट घेऊन उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे आणि त्याच वेळी गुरु गोविंद सिंग यांच्या 'दशम ग्रंथा'तील ओळी (वाणी) ऐकू येतात. ही बाब शीख समुदायाला अजिबात रुचलेली नाही. या तक्रारीमध्ये माधवन, रणवीर सिंग आणि चित्रपट निर्माते आदित्य धर यांची नावे नमूद करण्यात आली असून, त्यांच्यावर 'गुरबाणी'चा अपमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेता आर. माधवनने या प्रकरणावर स्पष्टीकरण देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच त्याने सर्वांची माफी देखील मागितली आहे. तो व्हिडीओत म्हणाला की, "नमस्कार, मी आर. माधवन! 'धुरंधर 2' ला प्रेम दिल्याबद्दल खूप आभार... चित्रपटातील एका सीनमध्ये गुरु गोविंद सिंग यांच्या 'दशम ग्रंथा'तील ओळी सुरू असताना मी सिगारेट ओढत असल्याचे बोले जात आहे. असा गैरसमज झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पण मी हे आता खात्रीने सांगतो की, मी सिगारेट विझवली होती. "

व्हिडीओ पुढे आर. माधवन म्हणाला की, "आदित्य धर यांनी मला आधीच सांगितलं होतं की, त्या ओळी बोलण्यापूर्वी सिगारेट विझवायची. जेणेकरून तोंडातून धूर बाहेर पडताना दिसणार नाही. स्क्रीनवर कुठेही धूर नसेल. तसेच हातातली सिगारेट दिसणार नाही...आम्हाला माहित आहे की, हा विषय खूप पवित्र आहे. तो सीन तुम्ही नीट पाहिला तर समजेल की, माझ्या तोंडातून धूर निघत नाही, तसेच फ्रेममध्ये कुठे धूर नाही..."

शेवटी माफी मागत आर. माधवन म्हणाला, "आम्हाला कोणाचाही भावना दुखवायच्या नाही. आम्ही शीख समाजाचा आदर करतो. प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजपूर्वी मी सुवर्ण मंदिरात जातो...चित्रपटात अजय सन्याल हे पात्र सिगारेट ओढणारे आहे. तरीसुद्धा नकळत कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT