Sonnalli Seygall And Ashesh L Sajnani Wedding Viral Video  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonnalli Seygall Wedding : लग्न एकाचं चर्चा भलत्याचीच, सोनाली सेहगलने कोणाशी बांधली लगीनगाठ?

Pyaar Ka Punchnama fame Sonnalli Seygall Weds Ashesh L Sajnani: ‘प्यार का पंचनामा २’ चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेली सोनाली सेहगल सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आली.

Chetan Bodke

Sonnalli Seygall Wedding Viral Video: ‘प्यार का पंचनामा २’ चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेली सोनाली सेहगल सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आली. मिळालेल्या माहितीनुसार, सोनालीने ७ जून रोजी तिचा बॉयफ्रेंड आशिष सजनानीसोबत लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीने आपल्या लाईफपार्टनरसोबत गुपचूप लग्नबंधनात अडकली आहे. सोनाली सेहगल गेल्या ५-६ वर्षांपासून आशिष सजनानीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे, मात्र दोघांनी कधीच त्यांच्या नात्याबद्दल उघड माहिती दिली नाही.

एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, सोनाली सेहगलने आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात केली आहे. सोनाली बऱ्याच दिवसांपासून आशिषला डेट करत होती. आशिष हा नोकरीने व्यापारी आहे, त्याचे अनेक हॉटेल्सदेखील असल्याची माहिती आहे. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ७ जून २०२३ रोजी दोघांनीही सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली.

अभिनेत्रीचा सोशल मीडियावर लग्नातील लूक व्हायरल होत आहे.लग्नामध्ये अभिनेत्रीने गुलाबी रंगीची ब्रायडल साडी नेसली असून त्यावर सिल्वर स्टोन वर्क केले आहे. सोनालीनं साडीवर डायमंडचा हेवी नेकलेस, बिंदी, नॉर्मल मेकअप करत लग्नातील लूक पुर्ण केला आहे. तर आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, अभिनेत्रीच्या लग्नात कुत्र्याने देखील एन्ट्री मारल्याचं दिसलं. कुत्र्याला लग्नात मॅचिंग गुलाबी रंगाचे कपडे घातले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनालीच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर कधीच नव्हती. सोनालीला लग्नाआधी आणि लग्नानंतर कधीच मीडियासोबत संवाद साधायचा नव्हते, सोबतच नात्याबद्दलही उघड करायचे नव्हते. रिपोर्ट्सनुसार, सोनालीला तिचे लग्न गुपित ठेवायचे होते आणि म्हणूनच ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी आश्चर्यचकित करणारी आहे. सोनालीने तिच्या खासगी आयुष्यातील अनेक बातम्या माध्यमांसमोर उघड करायच्या नव्हत्या. म्हणून तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी कधीच उघड केल्या नाहीत.

सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने २०११ मध्ये ‘प्यार का पंचनामा’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. लव रंजन दिग्दर्शित या चित्रपटात काम केल्यानंतर सोनाली ‘प्यार का पंचनामा २’ मध्येही दिसली होती. ‘वेडिंग पुलाव’ मध्येही या अभिनेत्रीने तिच्या कामाने सर्वांची मने जिंकली होती. सोनाली काही काळापूर्वी सलमान खानसोबत थम्स अपच्या जाहिरातीतही दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक संजय केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

SCROLL FOR NEXT