Good News For PVR Audience Saam TV
मनोरंजन बातम्या

Good News For PVR Audience : पीव्हीआर आयनॉक्समध्ये 1 रुपयात पाहता येणार 50 चित्रपटांचे ट्रेलर

50 Movie In 1 Rupee: पीव्हीआर आयनॉक्समध्ये जाऊन १ रुपयांत या ट्रेलर शोचे तिकीट मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

PVR Inox Showing 50 Trailers Of Upcoming Movie: भारतातील आघाडीची मल्टिप्लेक्स चेन पीव्हीआर-आयनॉक्सनं आपल्या प्रेक्षकांसाठी एक महिन्यापूर्वी ट्रेलर शोची घोषणा केली होती. ज्यामध्ये प्रेक्षकांना आगामी चित्रपटांचे ट्रेलर ३० मिनिटांसाठी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतील, तेही फक्त १ रुपयात. या नव्या संकल्पनेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला असून अवघ्या ५० दिवसांत या ट्रेलर शोची २.५० लाखाहून अधिक तिकिटांची विक्री झाली.

३० मिनिटांचे हे मनोरंजन म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच, जिथे बहुप्रतिक्षित सिनेमांचे १० ते १२ ट्रेलर एक रुपयात पाहायला मिळणार आहेत. संपूर्ण भारतभर या संकप्लनेला प्रेक्षकांनी पाठिंबा दिला आहे. मुंबईसह दिल्ली आणि बंगळुरू या शहरातील प्रेक्षकांनी या ट्रेलर शोला पसंती दर्शवली आहे. (Latest Entertainment News)

प्रेक्षकांव्यतिरिक्त प्रॉडक्शन हाऊस आणि फिल्म निर्मात्यांनी देखील या नव्या संकल्पनेची प्रशंसा केली आहे. देशभरातील सिनेप्रेमिकांसाठी ही मेजवानी असणार आहे. ३० मिनिटांचे हे एंटरटेन्मेंट पॅकेज लोकांना खूप आवडत आहे. (Movie)

या नव्या संकल्पनेला मिळणारा प्रतिसाद पाहता पीव्हीआर आयनॉक्सचे को-सीईओ गौतम दत्ता म्हणाले, ''ट्रेलर स्क्रीनिंग शोला मिळणाऱ्या प्रतिसादानं आम्हाला खूप छान वाटत आहे.

देशभरातील सिनेप्रेमिकांचा उत्साह पाहून आम्हाला देखील काहीतरी नवीन करण्याची उर्जा मिळते. ट्रेलरचं स्क्रीनिंग केल्यामुळे एक प्रकारे सिनेमाला देखील चांगला प्रतिसाद मिळण्यास सहाय्य होऊ शकतं. आम्हाला आनंद आहे की आमच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही हे पहिलं पाऊल उचललं''.

तर प्रेक्षक हो, जर तुम्हाला ही मनोरंजनाची पर्वणी अनुभवायची असेल तर तुमच्या जवळच्या पीव्हीआर आयनॉक्समध्ये जाऊन १ रुपयांत या ट्रेलर शोचे तिकीट खरेदी करून आगामी सिनेमांचे ट्रेलर एन्जॉय करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT