Shreyas Talpade on Pushpa 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade on Pushpa 2: श्रेयस तळपदेने शेअर केला ‘पुष्पा २’ मधील डबिंग करतानाची तारेवरची कसरत; “जर पुष्पा काही खात असेल तर...”

पुष्पाच्या ट्रेलरसाठी डबिंग करताना श्रेयसला आलेल्या आव्हानांविषयी आपला अनुभव स्पष्ट केला आहे.

Chetan Bodke

Shreyas Talpade Reveals The Most Challenging Part Of Dubbing Character: ‘पुष्पा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०२१ मध्ये चांगलीच कमाई केली. फार कमी वेळेत दमदार कमाई केल्याने चित्रपटाची आजही चर्चा होत आहे. चित्रपटाच्या डायलॉगने आणि गाण्यांनी प्रेक्षकांवर चांगली भूरळ घातली. चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने निर्मात्यांनी चित्रपटाच्या आगामी भागाची घोषणा केली आहे. अल्लू अर्जुनचा लूक प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. चित्रपटात मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेच्या आवाजाची देखील बरीच चर्चा झाली होती.

जितकी चर्चा अल्लू अर्जुनची झाली होती, तितकीच चर्चा श्रेयसच्या आवाजाची झाली होती. या चित्रपटाला श्रेयसने हिंदीतून आवाज दिला होता. त्यामुळे चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. अनेकदा चाहत्यांनी या आगामी चित्रपटात श्रेयसचा आवाज ऐकायला मिळणार का ? असा प्रश्न विचारला होता. अखेर याचं सर्वांना उत्तर मिळालं आहे. आता या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा श्रेयसचा आवाज चाहत्यांना ऐकायला मिळणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयसने ‘पुष्पा २’ चे डबिंगचं काम पूर्ण केल्याचं समजत आहे. यावेळी श्रेयसनं एका मुलाखतीत, पुष्पाच्या ट्रेलरसाठी डबिंग करताना आलेल्या आव्हानांविषयी आपला अनुभव स्पष्ट केला आहे. अनुभव सांगतो, “पुष्पासाठी डबिंग करणं हे फार आव्हानात्मक होतं. मला पुष्पाच्या मुडसोबत जुळून घेणं फार आव्हानात्मक होतं. मला अनेकदा आवाजात चढ- उतार, बदल अनेकदा करावा लागला होता. जेव्हा पुष्पा आवाज देतो, त्यावेळी मला वेळोवेळी बदल करणे आवश्यक होते जेणेकरून मला तो रोल योग्यरीत्या पकडता येईल. एका परफेक्शनिस्टप्रमाणे मला या पात्राचा आणि त्याच्या भावनांचा अनुभव योग्य प्रकारे घ्यायचा होता. त्याचा आवाज, मुड, स्वभाव आणि इ... मला योग्य तऱ्हेने जुळवून घेणं मला फार महत्वाचं होतं. उदा- पुष्पा काही चघळत असेल तर, त्याच्या त्या आवाजाप्रमाणे मला ही तसाच आवाज काढणे हे मला फारच आव्हानात्मक होते.”

यावेळी श्रेयसने चित्रपटाच्या पहिल्या भागाचा अनुभव शेअर करताना सांगितलं की, “जेव्हा मी पहिल्या भागाच्या काही सीन्सची डबिंग करत होतो, त्यावेळी चित्रपटाला इतकी प्रसिद्धी मिळेल असं वाटलं नव्हतं. या चित्रपटासाठी डबिंग करणं फार आनंददायी होते. त्याच जुन्या प्रवासात पुन्हा जाणे हे माझ्यासाठीही फार रोमांचकारी होते. पुन्हा अनेक आठवणींचा नॉस्टॅल्जिया जाणवत होता.”

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT