Pushpa 2  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 : 'पुष्पा २' चित्रपटादरम्यान थिएटरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्यांनी तुडवले, पाहा VIDEO

Pushpa 2 Screening : 'पुष्पा २' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान दोन गटात तुफान मारामारी झाली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

साउथ स्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' (Pushpa 2 ) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. जास्त पैसे मोजून चाहते 'पुष्पा 2' पाहण्यासाठी जात आहे.

हैदराबादमध्ये पार पडलेला 'पुष्पा 2' च्या स्क्रीनिंग दरम्यान अभिनेता अल्लू अर्जुनला (Allu Arjun ) पाहायला झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. आता थिएटरमध्ये चित्रपटादरम्यान मारामारी झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूल जिल्ह्यातील सिनेमागृहात 'पुष्पा 2' चित्रपटादरम्यान मोठा गोंधळ झाला. कांतिशिवा मल्टीप्लेक्समध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान दोन गटात वादविवाद झाले. यानंतर हे वाद इतका टोकाला गेले की पुढे दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्या तुडवले. दोन्ही गटांमध्ये बराच वेळ हाणामारी झाली. यावेळी सभागृहात उपस्थित इतर प्रेक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मारामारी थांबवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने वाद थांबला आणि त्यानंतर दोन्ही गटातील लोक चित्रपट न पाहताच निघाले.

वाद सुरू असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत आहे.

'पुष्पा 2: द रुल' चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. यात तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांचा समावेश आहे. चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची (Rashmika Mandanna ) केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या माजी आमदाराला सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका, जन्मठेपेची शिक्षा ठेवली कायम

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांना सोसाव्या लागत आहेत पाणीटंचाईचा झळा

'मशीद नाही तर मंदिरच'; धार भोजशाळेच्या विवादावर उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

काजू-आंबा उत्पादक आक्रमक, मंत्रालय परिसरात गोंधळ; राजू शेट्टी अन् महादेव जानकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात|VIDEO

Pakistan : मोठी बातमी! पाकिस्तानच्या लष्करी कॅम्पवर हल्ला, १५ सैनिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT