'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने खूप कमी वेळात मोठी कामगिरी केली आहे. 'पुष्पा 2' च्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत जात आहे.
'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटात साउथ स्टार अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हे मुख्य भूमिकेत आहेत. 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाची क्रेझ सध्या वाढताना दिसत आहे. अवघ्या तीन दिवसात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 400 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने पहिल्या दिवशी 64.25 कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 93.8 कोटींची कमाई केली. आता तिसऱ्या दिवशी 'पुष्पा 2: द रुल'ने 115 कोटींचा (Pushpa 2 Box Office Collection Day 3) बंपर कमाई केली आहे. तर चित्रपटाने पेड प्रिव्ह्यूजमध्ये 10.65 कोटी रुपये कमावले. एकूण 'पुष्पा 2' चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 383.7 कोटींची कमाई केली आहे.
'पुष्पा 2' हा चित्रपट सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाने खूप कमी वेळात मोठे रेकॉर्ड बनवले आहे. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने जगभरातील (Pushpa 2 Worldwide Collection) बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. अवघ्या चित्रपटाच्या रिलीजनंतर तीन दिवसात 'पुष्पा 2' ला हे यश मिळाले आहे. 'पुष्पा 2'चित्रपट जगभरातील 500 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा सर्वात जलद भारतीय चित्रपट ठरला आहे.
'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने तीन दिवसांत हिंदी भाषेत 200.7 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.