Pushpa 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2: श्रीलीला अन् अल्लू अर्जुनच्या रोमँटिक अंदाजाने चाहत्यांना लावलं वेड, 'पुष्पा २' मधील 'Kissik' ची झलक

Pushpa 2 Kissik Song : 'पुष्पा २' आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच 'पुष्पा २' चित्रपटातील आयटम साँग रिलीज झालं आहे.

Shreya Maskar

अल्लू अर्जुनचा बहुचर्चित चित्रपट 'पुष्पा 2' (Pushpa 2) आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. 'पुष्पा 2' मध्ये अल्लू अर्जुनसोबत साउथ अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

पुष्पाच्या पहिल्या भागातील आयटम साँग खूप गाजले होते. यात अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) समांथाने ठुमके लगावले होते. हे गाणे आजही लोकांच्या तोंडावर आहे. 'ऊ अंटावा'वर अल्लू अर्जुन आणि समांथा थिरकले होते. या गाण्याने सोशल मीडियावर जबरदस्त धुमाकूळ घातला. आता 'पुष्पा 2'चे आयटम साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याने देखील चाहत्यांना वेड लावले आहे.

'पुष्पा 2' च्या 'किसिक' (Kissik ) या आयटम साँगमध्ये अल्लू अर्जुनसोबत श्रीलीला (Sreeleela) रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे. यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ पडली आहे. या गाण्यावर कमेंट्स, लाइक्स आणि व्ह्यूजचा पाऊस पडत आहे. चेन्नईत 'किसिक' गाण्याचा लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि श्रीलीला हे तिघे देखली उपस्थित होते. 'पुष्पा 2' च्या या आयटम साँगसाठी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरला देखील विचारण्यात आले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2'च्या 'किसिक' या आयटम साँगसाठी श्रीलीलाने तब्बल २ कोटींचं मानधन घेतले आहे. श्रीलीला ही टॉलीवूडची दमदार डान्सर आहे. तिने अनेक हटके गाणी केली आहेत. 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुष्पाचा पहिला भाग 'पुष्पा: द राइज' चित्रपट 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WTC Points Table : टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करताच WTC पॉइंट टेबलमध्ये मोठा उलटफेर

Gulkand: गुलकंदापासून बनवा 'हा' खास पदार्थ, पाहता क्षणी तोंडाला सुटेल पाणी

Laxman Hake: नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी

Maharashtra News Live Updates: राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसच झाले पाहिजेत; भाजप नेत्यांची तीव्र इच्छा

Almonds: तुम्ही बदाम जास्त प्रमाणात खाता का? तर आरोग्यावर होऊ शकतात दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT