Pushpa 2 Controversy Sukumar Google
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Director house raid : पुष्पा 2 चा डायरेक्टर सुकुमारच्या घरावर 'इन्कम टॅक्स'ची धाड; 'साउथ'चे अनेक सुपरस्टार रडारवर

Pushpa 2 Movie Controversy: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' ने जगभरात १८०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. पण आता या चित्रपटाच्या डायरेक्टरच्या घरावर प्राप्तिकर विभागानं धाड टाकली आहे.

Shruti Vilas Kadam

Pushpa 2 Controversy : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात १८०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. पण चित्रपटाची कमाई निर्मात्यांसाठी अडचण ठरली आहे. रिपोर्टनुसार, 'पुष्पा २'चे दिग्दर्शक सुकुमार यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकला आहे. अलीकडेच, मैत्री मूव्ही मेकर्सच्या घरावर आणि कार्यालयावरही छापा टाकण्यात आला होता.

सुकुमारच्या घरावर छापा का पडला?

'पुष्पा २' चे दिग्दर्शक सुकुमार यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने जगभरात १८०१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. पण, चित्रपटाने केलेल्या कमाईनुसार कर भरला गेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय मैत्री मूव्ही मेकर्सच्या बँक व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे. इतर अनेक चित्रपट कलाकारांच्या घरांवरही छापे टाकले जात आहेत.

अलीकडच्या काळात ज्यांच्या घरांवर आयकर विभागाने छापे मारले, त्यात गेम चेंजरचे निर्माते दिल राजू, शिरीष आणि त्यांची मुलगी यांचा समावेश आहे. मैत्री मूव्ही मेकर्स आणि मँगो मीडियाच्या कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले. वसुलीच्या रकमेनुसार कर न भरल्याबद्दल पुष्पा २ चे डायरेक्टर सुकुमार यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे.

'पुष्पा २' साठी सुकुमारने किती पैसे घेतले?

पुष्पा २ हा चित्रपट ५०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार सुकुमारने या चित्रपटासाठी सुमारे १५ कोटी रुपये घेतले आहेत. या चित्रपटाने जगभरातून १८०० कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन ४८ दिवस झाले आहेत. आज ४९ वा दिवस आहे आणि चित्रपट अजूनही चांगली कमाई करत आहे. एकट्या भारतातून १२२९.४० कोटी रुपयांची कमाई करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

Gautami Patil: 'राधा ही बावरी' गौतमी पाटीलचं सुंदर सौंदर्य; फोटो पाहा

Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

Maharashtra Live News Update: इंदापुरात दहाहून अधिक नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

SCROLL FOR NEXT