Pushpa 2 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Box Office Collection : 'पुष्पा'नं मोडला RRRचा रेकॉर्ड; १२ व्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी, एकूण कलेक्शन किती?

Pushpa 2 Box Office Collection Day 12 : 'पुष्पा 2'ने 'आरआरआर' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाचे १२व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'पुष्पा 2' (Pushpa 2 ) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात साऊथ स्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. 'पुष्पा 2' हा ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. या चित्रपटाने आता पुन्हा एक रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.

'पुष्पा 2' चित्रपटाने जगभरात 12 दिवसात 1400 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाच्या १२व्या दिवशी 'पुष्पा 2'ने एसएस राजामौलीच्या 'आरआरआर' चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'पुष्पा 2' हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. 'पुष्पा 2' ने तर 'केजीएफ चॅप्टर २' चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'पुष्पा 2' आता लवकरच 1500 कोटी रुपयांचा गल्ला जमावणार आहे.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 12

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2'ने जगभरात 12 दिवसात 1400 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 929 कोटी कमावले आहेत. 'पुष्पा 2' लवकरच 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार आहे. या चित्रपटाने प्री-बुकिंगमध्ये देखील बंपर कमाई केली होती. 'पुष्पा 2'ने पेड प्रिव्ह्यूजमधून 10.65 कोटी रुपये कमावले.

'पुष्पा 2' चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहे. 2021 मध्ये 'पुष्पा – द राइज' हा चित्रपट भेटीला आला होता. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. 'पुष्पा 2'चित्रपटाची गाणी खूप गाजत आहेत. सोशल मीडियावर 'पुष्पा 2'च्या गाण्यांचा क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटामुळे अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) लोकप्रियतेमध्ये भर पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT