Pushpa 2 Box Office Collection Day 11 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Box Office Collection Day 11: 'पुष्पा 2' चा बोलबाला; 900 कोटींचा टप्पा पार, रविवारी किती कमावले?

Pushpa 2 Collection : 'पुष्पा 2'ने खूप कमी वेळात कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटातील जबरदस्त ॲक्शनने चाहत्यांना वेड लावले आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचे ११व्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्याने खूप कमी दिवसात उंच उडी मारली आहे. जगभरात कोट्यवधींचा गल्ला जमावला आहे. या चित्रपटाने दुसऱ्या रविवारी देखील बंपर कमाई केली आहे. 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 Box Office Collection Day 11) चित्रपटाचे ११ व्या दिवसाचे म्हणजे रविवारचे कलेक्शन किती, जाणून घेऊयात.

'पुष्पा 2' अल्लू अर्जुनने आपल्या ॲक्शनने चाहत्यांना वेड लावले आहे. तसेच चित्रपटातील रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अल्लू अर्जुनची चित्रपटातील केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. 'पुष्पा 2'चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभराला वेड लावले आहे.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 11

पहिला दिवस - 164.25 कोटी

दुसरा दिवस - 93.8 कोटी

तिसरा दिवस - 119.25 कोटी

चौथा दिवस - 141.5 कोटी

पाचवा दिवस - 65.1 कोटी

सहावा दिवस - 52.50 कोटी

सातवा दिवस - 42 कोटी

आठवा दिवस - 37.95 कोटी

नववा दिवस - 36.40 कोटी

दहावा दिवस - 62.3 कोटी

अकरावा दिवस - 75 कोटी

पेड प्रिव्ह्यूज - 10.65 कोटी

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाने 11 दिवसात तब्बल 900 कोटींचा कलेक्शन टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने दिसऱ्या रविवारी बंपर कमाई केली आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच पुष्पा भाऊने वेड लावले आहे. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाची क्रेझ वाढताना पाहायला मिळत आहे. जगभरात 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने 1200 कोटींचा टप्पा पार केला आहे.

आताही 'पुष्पा 2' पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 'पुष्पा 2' चित्रपट हाऊसफुल्ल आहे. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने अनेक बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहेत. केजीएफ २, बाहुबली, ॲनिमल यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT