Pushpa 2 Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Collection: 'पुष्पा 2'चा तिसऱ्या रविवारी डंका; 'बाहुबली'ला टाकले मागे, एकूण कमाई किती?

Pushpa 2 Box Office Collection Day 18 : अखेर 'पुष्पा 2' चित्रपटाने 'बाहुबली 2' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Shreya Maskar

'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2) हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून जगभरात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आता 'बाहुबली 2' रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2' तिसऱ्या संडेलाही बंपर कमाई केली आहे. आता 'पुष्पा 2: द रुल' भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन 18

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात बंपर कमाई केली आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 725.8 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटींची कमाई केली. अखेर तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी 'पुष्पा 2' चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार,'पुष्पा 2' चित्रपटाने तिसऱ्या रविवारी (Pushpa 2 Box Office Collection Day 18) 33.25 कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1062.9 कोटींची बंपर कमाई केली आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजच्या 18 दिवसात 'बाहुबली 2' चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'बाहुबली 2' चे कलेक्शन 1030.42 कोटी रुपये आहे.

'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाने तेलुगु आणि हिंदी भाषेत सर्वात जास्त कमाई केली आहे. चित्रपटाने हिंदी भाषेत 679.65 कोटी रुपयांचे जबरदस्त कलेक्शन केले आहे. तसेच तेलगूमध्ये 307.8 कोटी रुपये, तामिळमध्ये 54.05 कोटी रुपये, कन्नडमध्ये 7.36 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 14.04 कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT