Allu Arjun Saam Tv
मनोरंजन बातम्या

Allu Arjun: तुरुंगाबाहेर येताच पुष्पाने मागितली माफी, हात जोडत म्हणाला....

Pushpa 2 Allu Arjun: अल्लू अर्जुनची सुटका झाली असून तुरूंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनने प्रतिक्रिया दिली आहे.

Manasvi Choudhary

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन पुष्पा 2 चित्रपटामुळे चर्चेत आहे. काल गुरूवारी पुष्पा चित्रपटाच्या प्रिमीयर सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेमुळे अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. प्रिमीयर शोला झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. यामुळे पोलिसांनी काल अल्लू अर्जुनला अटक केली. आज अल्लू अर्जुनची सुटका झाली असून तुरूंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनने प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता अल्लू अर्जुनला काल अटक केल्यानंतर चाहत्यांसह सर्वांनाच धक्का बसला होता. अल्लू अर्जुनचे चाहते देखील नाराज झाले होते. एक रात्र तुरूंगात राहिल्यानंतर अल्लू अर्जुनची सुटका झाली आहे. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनने माध्यमांशी संवाद साधला आहे.

अल्लू अर्जुन म्हणाला, "मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. कायद्याचा मी सन्मान करतो. मी यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. महिलेच्या मृत्यू झाल्याने मी दु:ख व्यक्त करतो, मी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. घडलेली दुर्घटना फार दुर्देवी होती. आम्ही चित्रपट पाहायला गेलो होतो. घडलेली घटना ही मुद्दाम घडवून आणलेली नाही. यामागे कोणताही हेतू नाही. आणि त्याबाबत मी माफी मागतो अशी प्रतिक्रिया अल्लू अर्जुनने दिली. "

पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रिमीयर शोला झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला यामुळे अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल झालेल्या अटकेत अल्लु अर्जूनला १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी देखील सुनावण्यात आली. या निर्णयाविरोधात अल्लू अर्जुनने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर अल्लू अर्जुनला जामीन मंजूर करण्यात आला. मात्र जामीन मंजूर होऊनही एक रात्र अल्लू अर्जुनने तुरूंगात काढली आहे. त्यानंतर आज सकाळी अल्लू अर्जुन तुरूंगातून बाहेर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT