Rashmika Mandanna SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna : 'पुष्पा'ला श्रीवल्लीनं दिलं खास गिफ्ट, अल्लू अर्जुनने मानले आभार

Rashmika Mandanna Diwali Gift For Allu Arjun : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने अल्लू अर्जुनला एक खास गिफ्ट पाठवलं आहे. यात तिने अल्लू अर्जुनसाठी एक संदेश लिहिला आहे. नेमकं पत्रात काय जाणून घ्या.

Shreya Maskar

'पुष्पा 2'ची को-स्टार अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला (Allu Arjun ) दिवाळीनिमित्त खास भेट पाठवली आहे. रश्मिकाने अल्लू अर्जुनला चांदीचं नाणे आणि मिठाई पाठवली. त्यासोबत एक सुंदर पत्र देखील पाठवलं आहे.

अल्लू अर्जुनने अलिकडेच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ती म्हणजे रश्मिका मंदान्नाने (Rashmika Mandanna) पाठवलेली खास भेटवस्तू शेअर केली. 'पुष्पा:द राइज' मधील श्रीवल्लीच्या व्यक्तिरेखेने प्रसिद्ध झालेल्या रश्मिका मंदान्नाने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिने अल्लू अर्जुनला भेटवस्तू आणि पत्र पाठवले आहे.

अल्लू अर्जुनने रश्मिकाकडून मिळालेल्या भेटवस्तूचा फोटो शेअर करून पोस्टमध्ये पोस्टमध्ये रश्मिकाचे आभार मानले आणि तिच्या वागण्याचे कौतुक केले. त्याने लिहिलं की ऑफ स्क्रिन देखील घट्ट मैत्री आहे. रश्मिकानं पत्रात लिहिलं की, "माझ्या आईने सांगितले होते की एखाद्याला चांदीची भेटवस्तू दिल्याने सौभाग्य लाभते. मला आशा आहे की, ही छोटी चांदीची भेटवस्तू आणि मिठाई अधिक सौभाग्य, सकारात्मकता आणि प्रेम देईल. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. खूप प्रेम,रश्मिका मंदान्ना"

अल्लूने रश्मिकाचे आभार मानले असून, 'धन्यवाद डियर, आता नशिबाची गरज आहे. असे लिहिले आहे. रश्मिकाला प्रेमाने 'अश्रफी गर्ल' म्हटले जाते. ती 'पुष्पा:द रुल' च्या बहुप्रतिक्षित सिक्वेलमध्ये श्रीवल्लीच्या भूमिकेत परतणार असून या व्यक्तिरेखेत पुन्हा पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ५ डिसेंबरला अनेक भाषांमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली जाण्याची शक्यता आहे, असे वृत्त आहे. मात्र त्याआधीचं या चित्रपटाने एक हजार कोटींचा व्यवसाय केला आहे.

Edited by - Archana Chavan

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT