Attack on Singer Saam tv
मनोरंजन बातम्या

Attack on Singer: 'यह तो बस शुरुआत है।', प्रसिद्ध गायकावर बेछूट गोळीबार, पोटाला लागली गोळी; हल्ल्यामागचं कारणही समोर

Attack on Singer: कॅनडात पंजाबी गायिका तेजी काहलोनवर गोळीबार झाला असून तो उपचाराधीन आहे. रोहित गोदारा टोळीने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याने खळबळ उडाली आहे.

Shruti Vilas Kadam

Attack on Singer: संगीतविश्वाला हादरवणारी घटना समोर आली आहे. लोकप्रिय पंजाबी गायक तेजी काहलोन याच्यावर कॅनडा येथे गोळीबार झाला असून सध्या त्याच्या पोटात गोळी लागली आहे. तो रुग्णालयात उपचार घेत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काहलोनची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे आणि तो हळूहळू बरा होत आहे.

या हल्ल्याची जबाबदारी भारतातील कुख्यात गुंड रोहित गोदारा टोळीच्या सदस्यांनी सोशल मीडियाद्वारे स्वीकारली आहे. फेसबुकवर पोस्ट करून महेंद्र सरन दिलाना, राहुल रिनाऊ आणि विकी फालवान या तिघांनी या घटनेची कबुली दिली आहे. त्यांनी काहलोनवर प्रतिस्पर्धी टोळ्यांना आर्थिक मदत केल्याचा, त्यांना शस्त्रे पुरवल्याचा आणि माहितीदार म्हणून काम केल्याचा आरोप केला आहे. या पोस्टमध्ये स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, “जो कोणी आमच्या शत्रूंना पाठिंबा देईल, त्यालाही असेच वागवले जाईल. ही फक्त सुरुवात आहे.”

पोलिसांनी गोळीबाराचे नेमके ठिकाण आणि वेळ उघड केलेली नाही. कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, मात्र तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर परदेशात कार्यरत असलेल्या भारतीय गुन्हेगारी नेटवर्कच्या वाढत्या प्रभावाबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.

तेजी काहलोनने या हल्ल्याबाबत किंवा त्याच्यावरील आरोपांबाबत कोणतेही सार्वजनिक वक्तव्य केलेले नाही. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून गुन्हेगारी नेटवर्कशी संबंधित कोणतेही संकेत दिसून आलेले नाहीत

कॅनडातील पंजाबी कलाकारांवर अशा प्रकारच्या घटना आधीही घडल्या आहेत. सप्टेंबर २०२४ मध्ये व्हँकुव्हर येथे पंजाबी गायक ए.पी. ढिल्लन यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारीही बिश्नोई-गोदरा टोळीने घेतली होती.

दरम्यान, या हल्ल्यामागे ज्याचे नाव सर्वाधिक घेतले जात आहे तो म्हणजे रोहित गोदारा, ज्याला रावतराम स्वामी म्हणूनही ओळखले जाते. राजस्थानमधील हा कुख्यात गुंड सध्या राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अनेक राज्य पोलिस दलांना हवा आहे. त्याच्यावर पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (२०२२), गँगस्टर राजू तेहत (२०२२) आणि करणी सेना प्रमुख सुखदेव सिंग गोगामेदी (२०२३) यांच्या हत्यांचे आरोप आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जनावरे चारायला गेलेल्या दोघा बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू

Bihar Politics : बिहारमधील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादळ; मुलगी रोहिणी आचार्य यांनी घेतला मोठा निर्णय

Garlic Pickle Recipe: चटपटीत, चमचमीत लसूण लोणचं घरी कसं बनवायचं?

Motichur Ladoo Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असले तर घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी मोतीचूर लाडू

Ind vs SA 1st Test : भारताचा दक्षिण आफ्रिकेला जोरदार झटका, वर्ल्ड चॅम्पियन संघाचा तिसऱ्या दिवशीच सुपडासाफ करणार

SCROLL FOR NEXT