Singer Ranjit Sidhu End His Life Instagram
मनोरंजन बातम्या

Punjabi Singer Ranjit Sidhu Death : प्रसिद्ध पंजाबी गायकाने नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय; चाहत्यांवर शोककळा

Singer Ranjit Sidhu : पंजाबी गायक रणजीत सिद्धू यांनी आत्महत्या केली आहे.

Pooja Dange

Singer Ranjit Sidhu End His Life : पंजाबी गायक रणजीत सिद्धू यांनी आत्महत्या केली आहे. शुक्रवारी रात्री रेल्वे रुळाजवळ एक मृतदेह आढळून आला, पोलिसांच्या तपासात हा मृतदेह रणजीत सिद्धूचा असल्याचे निष्पन्न झाले. गायकाने नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.

रणजीत सिद्धूच्या मृत्यूप्रकरणी जीआरपी एसआयचे वक्तव्यही समोर आले आहे. 'सच कहूं'च्या रिपोर्टनुसार, जीआरपी आणि एसआय जगविंदर सिंह आणि नरदेव सिंह यांनी सांगितले की, पोलिसांना शुक्रवारी रात्री रेल्वे ट्रॅकजवळ एक मृतदेह आढळला. (Latest Entertainment News)

पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह अन्य कोणाचा नसून नछतर सिंग यांचा मुलगा रणजित सिंगचा असल्याचे समोर आले.

रिपोर्टनुसार, रणजीत सिद्धूच्या पत्नीचे वक्तव्यही समोर आले आहे. गायकाच्या पत्नीने आरोप केला आहे की, पतीचे नातेवाईकांशी वाद सुरू होते. त्याचे नातेवाईक त्याचा सतत छळ करत होते. नातेवाइकांच्या जाचाला कंटाळूनच रणजितने आत्महत्या केली. (Celebrity)

गायक रणजीत सिद्धूच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, त्याने दिवसांपूर्वी त्यांनी मुलीचे लग्न केले होते. तेव्हापासून त्यांचे सारखे नातेवाईकांशी भांडण होत होते. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृतदेहाचे पोस्टमार्टमही करण्यात आले असून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anushka Sen : अनुष्का सेनचा बॅकलेस गाउन लुक पाहिलात का?

Maharashtra Live News Update : अमरावती शहरातील प्रभात टॉकीज परिसर मध्ये बॉम्ब असल्याच्या बातमीने उडाली खळबळ

Vaibhav Taneja Tesla : एलोन मस्क यांच्या अमेरिका पार्टी'मध्ये मोठी जबाबदारी पार पाडणारे वैभव तनेजा नेमके कोण?

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद; गोपीचंद पडळकरांची टीका करताना जीभ घसरली|VIDEO

Politics: भाजप मेलाय, त्यांनी मविआतून उरबडवे घेतले; उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर तिखट वार

SCROLL FOR NEXT