Singer Jasmine Sandlas Saam Tv
मनोरंजन बातम्या

Singer Jasmine Sandlas : लॉरेन्स बिश्नोई गॅगच्या टार्गेटवर अजून एक पंजाबी सिंगर; दिल्ली विमानतळावर उतरताच आला धमकीचा कॉल

Lawrence Bishnoi Threat: अजून एक पंजाबी सिंगर लॉरेन्स बिश्नोई गॅगच्या टार्गेटवर आहे.

Bharat Jadhav

Punjabi singer Jasmine Sandlas:

पंजाबी गायिका जास्मिन सॅडलसला लॉरेन्स बिश्नोई गॅगकडून जिवे मारण्याची धमकी मिळाली. जास्मिन अमेरिकेत राहत असून तिला आज फोनद्वारे जिवे मारण्याची धमकी लॉरेन्स बिश्नोई गॅगकडून देण्यात आली. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जास्मिनचा गायनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी दिल्ली विमानतळावर येताच तिला आंतरराष्ट्रीय नंबरवरून धमकीचे कॉल येऊ लागले. (Latest News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगर जास्मिनला फोनद्वारे जिवे मारण्याची धमकी दिली जात होती. दिल्लीच्या जवाहरलाल स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमात तिच्यावर जीवघेणा हल्ला होईल, अशी धमकी फोनद्वारे दिली जात होती. यानंतर गायिका ज्या ५ स्टार हॉटेलमध्ये राहत होती त्या हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आलीय.

जास्मिन सँडलसने काही बॉलिवूड गाण्यांना तिने आवाज दिलाय. सलमान खानच्या 'किक' चित्रपटातील 'यार ना मिले' आणि 'स्ट्रीट डान्स ३डी' चित्रपटातील 'इलेगल वेपन २.० हे गाणे गायले आहे. यात वरुण धवन आणि श्रद्धा कपूरनं अभिनय केलाय. दरम्यान गॅगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अहमदाबादच्या तुरुंगात आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहे. तर लॉरेंस हा पंजाबी गायक सिदधू मूसेवालाच्या हत्येतही आरोपी आहे. याचबरोबर लॉरेन्सने कॅनाडा खालिस्तानी दहशतवादी सुखदूल सिंहच्या हत्येची जबाबदारी घेतल्यामुळे लॉरेन्स परत एकदा चर्चेत आलाय. तर लॉरेन्सने बॉलिवूड अभिनेता सलमान खानलाही जिवे मारण्याची धमकी दिलीय. सलमान खानला इमेल पाठवून धमकी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT