Social Media last Post  Saam tv
मनोरंजन बातम्या

Social Media last Post : प्रसिद्ध गायक काळाच्या पडद्याआड; मृत्यूआधीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Social Media last Post : प्रसिद्ध गायक काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्याची मृत्यूआधीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

प्रसिद्ध पंजाबी गायक हरमन सिद्धू याचे अपघाती निधन

मृत्यूच्या काही दिवस आधी केलेली त्याची रील व्हायरल

कारने ट्रकला धडक दिल्याने हरमानचा अपघात

'पेपर या प्यार' या गाण्यामुळे हरमन सिद्धूला रातोरात प्रसिद्धी

पंजाबी संगीत क्षेत्रातून दु:खद घटना समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक हरमन सिद्धू याचा अपघाती निधन झालं आहे. सिद्धू याच्या मृत्यूने संपूर्ण संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते लाडक्या गायकाला श्रद्धांजली वाहत आहे. याचदरम्यान हरमनची मृत्यूआधीची पोस्ट चर्चेत आली आहे.

हरमन सिद्धूने सोशल मीडिया प्लॅटफर्म इन्स्टाग्रामवर १० ऑक्टोबर रोजी एक पोस्ट केली होती. हरमन एका तरुणीसोबत दिसत आहे. यात 'पेपर या प्यार' या गाण्यावर रील करताना दिसत आहे. गायकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे. या पोस्टमध्ये चाहत्यांनी गायकाचं भरभरून कौतुक केलं आहे.

गायक हरमन सिद्धू याचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. हरमनची कारने ट्रकला धकड दिली. या धडकेत हरमनचा जागीच मृत्यू झाला. हरमन रात्री उशिरा १२ वाजण्याच्या सुमारास त्याच्या गावी निघाला होता.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हरमनचा मृत्यूदेह ताब्यात घेतला. गायकाच्या निधनाने संपूर्ण कुटुंब आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हरमनचं 'पेपर या प्यार' हे गाणं खूप गाजलं होतं.

'पेपर या प्यार' गाणं

'पेपर या प्यार' गाण्याला प्रचंड प्रेम मिळालं होतं. हरमनच्या चाहत्यांनी गाण्यावर हजारो रील्स देखील तयार केल्या होत्या. या गाण्यामुळे हरमन रातोरात प्रसिद्धी मिळाली. आजही अनेकांना हरमनचं ते गाणं आवडतं. अनेक जण त्याच्या या गाण्याचं कौतुक करताना दिसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हाताने उखडला डांबरी रस्ता, ग्रामस्थांचा ठेकेदाराविरोधात संताप

SCROLL FOR NEXT