Famous Singer Accident SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Singer Accident : प्रसिद्ध गायकाचा भयंकर अपघात, गाडी थेट डिव्हायडरला धडकली

Singer Accident : प्रसिद्ध गायकाच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. गाडी थेट डिव्हायडरला धडकली आहे. नेमकं काय घडलं , जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

प्रसिद्ध गायकाच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे.

गाडी थेट डिव्हायडरला धडकली आहे.

मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायकाचा अपघात झाला आहे. हा गायक दुसरा-तिसरा कोणी नसून पंजाबी इंडस्ट्री गाजवणारा लोकप्रिय गायक हरभजन मान आहे. एका कार्यक्रमातून चंदीगडला परतत असताना ही दुर्घटना घडली आहे. हरभजन मान याने आजवर आपल्या गाण्याने चाहत्यांना वेड लावले आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.

हरभजन मानच्या (Harbhajan mann ) कारला एक भयानक अपघात झाला असून मिळालेल्या माहितीनुसार, गायक दिल्लीत एक कार्यक्रम करून चंदीगडला परतत होता. तेव्हा त्यांची गाडी पिपली उड्डाणपुलावर एका डिव्हायडर धडकली. अपघातात गायक थोडक्यात बचावला आहे. डिव्हायडरला धडकल्यानंतर गाडी उलटली झाली. त्यानंतर मागून एक गाडी आली. त्यात सुरजीत सिंग नावाची व्यक्त होती. तिने गायक हरभजन मान आणि त्याच्यासोबत कारमधील चार जणांना वाचवले.

अपघातात हरभजन मानला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही आहे. परंतु त्याच्या सुरक्षा रक्षकाला मोठी दुखापत झाली आहे. अपघाताच्या वेळी हरभजनच्या गाडीत त्याच्याशिवाय चार जण होते. यात मॅनेजर, ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. घटनेनंतर हरभजन मान चंदीगडला रवाना झाला. त्याची प्रकृती पूर्णपणे ठीक असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी घडली आहे.

हरभजन मान कोण?

हरभजन मान हा पंजाबी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक आहे. ज्याने आपल्या गोड आवाजाने इंडस्ट्री गाजवली आहे. त्याच्या स्टेज शोसाठी कायम प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. त्याचे चाहते परदेशातही आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narnala Fort History: ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण, अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला माहितेय का? जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चेने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

Heart disease symptoms: 'ही' ५ लक्षणं दिसली तर समजा एंजियोप्लास्टी करण्याची आहे गरज; वेळीच टाळा हार्ट अटॅकचा धोका

Nanded : विशेष पॅकेजमधून नांदेड जिल्हा वगळला; शेतकरी आक्रमक, गांजा लागवड परवानगीची केली मागणी

जबरदस्त! जयस्वालनं वेस्ट इंडीजची केली धुलाई, शतक ठोकलं; जे फक्त सचिन तेंडुलकरला जमलं, ते यशस्वीलाच करता आलं

SCROLL FOR NEXT