Kuch Khattaa Ho Jaye Movie Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kuch Khattaa Ho Jaye: गुरू रंधावा आणि सई मांजरेकरच्या 'कुछ खट्टा हो जाये'चा धमाकेदार टीझर आऊट

Kuch Khattaa Ho Jaye Movie Teaser: गुरू रंधावा कुछ खट्टा हो जाये' (Kuch Khatta Ho jaye Movie) या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात करणार आहे. मराठमोळी अभिनेत्री सई मांजरेकरसोबत तो या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Priya More

Guru Randhawa And Saiee Manjarekar:

पंजाबचा प्रसिद्ध गायक गुरु रंधावा (Guru Randhawa) लवकरच बॉलिवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री करणार आहे. तो 'कुछ खट्टा हो जाये' (Kuch Khatta Ho jaye Movie) या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात करणार आहे. मराठमोळी अभिनेत्री सई मांजरेकरसोबत तो या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा मजेशीर टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

गुरू रंधावाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'कुछ खट्टा हो जाये' चा टीझर शेअर केला आहे. टीझरच्या सुरुवातीला गुरु रंधावा म्हणतो, 'गुड मॉर्निंग, मी तुमचा होस्ट आणि मित्र, मी तुमच्यासाठी हृदयाची आणखी एक गोष्ट घेऊन आलो आहे. एका वेड्या मजनूची, एका सुंदर लैलची आणि त्यांच्या अत्यंत वळणदार प्रेमाची ही कहाणी आहे. लैला-मजनूच्या या प्रेमकथेत प्रेम तर खूप होतं. पण त्याच्या कथेचा खरा ट्विस्ट काही वेगळाच होता.'

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे देखील या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटाच्या टिझरमध्ये अनुपम खेर यांची देखील झलक दाखवण्यात आली आहे. गुरू रंधावाने इन्स्टाग्रामवर हा टिझर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एक लव्ह स्टोरी...जी ऐवढी गोड आहे जसं की कॅन्डी...वेडा मजनू आणि सुंदर लैलाच्या मोहक गोष्टींसह भरपूर मजा करण्यासाठी आमच्यासोबत सहभागी व्हा.'

गुरु रंधावा या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्यामुळे त्याचे चाहते खूपच उत्सुक आहेत. गुरूच्या या इन्स्टा पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट्समध्ये लिहिले की, 'गुरू तुला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे.' दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, 'तुझा लूक खूपच छान आहे. चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहे.'

गुरू आणि सईचा हा चित्रपट एक कौटुंबिक मनोरंजन आहे. ज्यामध्ये अनुपम खेर आणि इला अरुण यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. 'कुछ खट्टा हो जाये' हा चित्रपट एक हृदयस्पर्शी कौटुंबिक कॉमेडी आहे. हा चित्रपट येत्या 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. कुछ खट्टा हो जाए या चित्रपटाचे दिग्दर्शन जी. अशोक यांनी केले आहे. तर अमित आणि लविना भाटिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Somwar Upay: सोमवारच्या दिवशी करा 'या' सोप्या उपायांनी मिळवा सुख-शांती; भगवान शंकरही होतील प्रसन्न

Raw Banana Curry Recipe: फक्त काही मिनिटांत बनवा हिरव्या केळ्याची स्वादिष्ट करी, वाचा स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Accident: वारकऱ्यांना घेऊन जाणारी एसटी बस रस्त्यावर उलटली, ३० प्रवासी गंभीर जखमी

CA Topper 2025: छत्रपती संभाजीनगरच्या लेकाचा देशात डंका! राजन काबरा CA परीक्षेत पहिला

SCROLL FOR NEXT