Daler Mehndi Case  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Daler Mehndi Case : गायक दलेर मेहंदीला मोठा दिलासा; कोर्टाकडून तुरूंगवासाच्या शिक्षेला स्थगिती

पटिलाया कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात दलेरलने उच्च न्यायालयात अपील केले होते.

Satish Daud

Daler Mehndi Case : प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दलेरला हरियाणा कोर्टाने एक मोठा दिलासा दिला आहे. मानवी तस्करीप्रकरणी दलेरला पटियाला कोर्टाने २ वर्षाची शिक्षा सुनावली होती. जी आता हरियाणा कोर्टाने रद्द केली आहे. त्यामुळे दलेर मेहंदीला मोठा दिलासा मिळाला आहे. पटिलाया कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात दलेरलने उच्च न्यायालयात अपील केले होते. (Daler Mehndi Case Latest News)

काय आहे प्रकरण?

मीडिया रिपोर्टनुसार, २००३ साली घडलेल्या मानवी तस्करीच्या गुन्ह्यासाठी दलेरला २ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. याव्यतिरिक्त त्याला २ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला होता. दलेर मेहंदी आणि त्यांचा भाऊ शमशेर यांच्यावर असा आरोप करण्यात आला होता की ते बेकायदेशीर स्वरुपात लोकांना परदेशात पाठवून त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करायचे.

दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेर सिंग या दोघांवर मोठ्या प्रमाणात 'पॅसेज मनी' आकारल्याचा आरोप करण्यात आला होता. दलेर आणि त्यांच्या टीममधील सदस्यांच्या वेशात लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवायचे, त्यासाठी हा पॅसेज मनी घेतला जायचा. असे गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आले होते. (Daler Mehndi Todays News)

याप्रकरणी २०१८ मध्ये ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासने दोन्ही भावांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यानंतर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर या दोघांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र सत्र न्यायालयाने त्यांचे अपील रद्द करून दलेरलचा तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान, आता हरियाणा कोर्टाने दलेर मेहंदीची शिक्षा रद्द केली असून लवकरच त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात सुरू राहणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : भगवान गणेशाची कृपा होणार, गुप्तधनाचे मार्ग सापडतील; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार, वाचा

Local Body Polls 2025 : 'पालिका निवडणुकीत VVPT नाही'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, VIDEO

Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? अधिकृत तारीख आली समोर

State Marathi Film Awards2025: मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा दणक्यात साजरा; कोणकोणत्या नामवंतांचा झाला गौरव? वाचा यादी

Nanded Crime:शिवसेना पदाधिकाऱ्याचा कारमाना;'स्पा सेंटर'च्या नावाखाली चालवायचा कुंटणखाना

SCROLL FOR NEXT