Singer Died Saam Tv
मनोरंजन बातम्या

Singer Died: प्रसिद्ध गायकाचे ३५ व्या वर्षी निधन, संगीत विश्वावर शोककळा

Singer Gurmeet Mann Dies: प्रसिद्ध गायक गुरमीत मान याचे निधन झाले. अवघ्या ३५ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूमुळे पंजाब संगीत विश्वावर शोककळा पसरली.

Priya More

Summary -

  • प्रसिद्ध पंजाबी लोकगायक गुरमीत मान याचे निधन झाले

  • वयाच्या ३५ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला

  • ते लोकगीतांसाठी प्रसिद्ध होते आणि प्रीत पायल यांच्याबरोबर गात होते

  • पंजाबमधील संगीतविश्वात या घटनेमुळे शोककळा पसरली

पंजाबच्या संगीत विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध लोकगायक गुरमीत मान याचे निधन झाले. गायक राजवीर जवंदा यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत नाही तोवर पंजाब संगीत विश्वात आणखी एका गायकाचे निधन झाले. गुरमीत मान यांच्या निधनामुळे चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्वजण सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहत आहेत.

गुरमीत मान हे मूळचे पंजाबच्या रोपार जिल्ह्यातील रहिवासी होते. ते त्यांच्या लोकगीतांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी पंजाब पोलिस दलात देखील काम केले होते. त्यांच्या अचानक निधनाने संगीतप्रेमींना मोठा धक्का बसला. गुरमीत मान आणि प्रीत पायल यांची जोडी खूप प्रसिद्ध झाली. त्यांनी एकत्र येत अनेक लोकगीते गायत पंजाबी संस्कृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला.

गुरमीत मान हे आपल्या आवाजाच्या माध्यमातून रसिकांची मनं जिंकत होते. त्यांच्या संगीत कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित राहत होते. एका आठवड्यामध्ये दोन प्रसिद्ध गायकांचा मृत्यू झाल्यामुळे पंजाबी संगीत उद्योगात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर दोघांचे चाहते पोस्ट करत श्रद्धांजली वाहत आहेत.

दरम्यान, पंजाबी गायक राजवीर जवंदा याचे ८ ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. रस्ते अपघातामध्ये राजवीर जावंदा याचा मृत्यू झाला होता. २७ सप्टेंबर रोजी अपघाताची ही घटना घडली. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या राजवीर यांना उपचारासाठी मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान ११ व्या दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT