श्रद्धा वालकर प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. देशातील लोकांमध्ये प्रचंड संताप असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही या घटनेबद्दल ट्विट केले आणि श्रद्धाच्या आरोपीला फाशी द्यावी अशी प्रार्थना केली. तर एका चित्रपट दिग्दर्शकाने या हृदयद्रावक हत्याकांडावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली.
मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार निर्माते-दिग्दर्शक मनीष एफ सिंग यांनी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडावर आधारित चित्रपट बनवण्याची घोषणा केली. त्यांचा चित्रपट लिव्ह-इन बॉयफ्रेंड आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धा वालकरच्या केलेल्या हत्येपासून प्रेरित असल्याचे उघड केले. त्यांनी चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू केले आहे.
मनीष एफ सिंग यांनी सांगितले की, 'त्यांचा चित्रपट लव्ह जिहादवर असेल आणि मुलींना फसवणे आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे यासारख्या कारस्थानांना उघड करणार आहेत. देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडालाही अनेकजण लव्ह जिहादचे नाव देत आहेत. या टप्प्यावर कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे खूप घाई आहे. या खून प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आरोपी आफताब अमीन पूनावाला रोज नवनवीन मार्गाने पोलिसांची दिशाभूल करत आहे. दिवसेंदिवस हे कोडे सुटण्याऐवजी गुंतागुंतीचे होत असल्याचे दिसून येत आहे.' (Love Jihad)
मनीषच्या यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी त्यांच्या टीमसोबत चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू केले आहे. वृंदावन फिल्म्सच्या बॅनरखाली ते हा चित्रपट बनवणार आहेत. 'व्हू किल्ड श्रद्धा वॉकर' या चित्रपटाचे वर्किंग टायटल त्यांनी ठेवले आहे. त्यांच्या टीमने दिल्लीच्या आजूबाजूच्या जंगलातील व्हिडिओ क्लिपचे संशोधन सुरू केले आहे. शूटिंगसाठी लोकेशनही शोधले जात आहे. (Movie)
'दिल्ली पोलिस या प्रकरणात आरोपपत्र दाखल करेपर्यंत चित्रपटाची पटकथा निश्चित केली जाणार नाही, कारण केवळ आरोप पत्रातूनच खरे चित्र आणि हत्येचे सर्व तपशील समोर येतील. चित्रपट पूर्णपणे श्रद्धाच्या खून प्रकरणावर आधारित नसून त्यातून प्रेरित असेल.' असे मनीष एफ सिंह यांनी सांगितले आहे. चित्रपटामध्ये कोण काम करणार याची माहिती सध्या तरी देण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.