Mirzapur Season 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mirzapur Season 3: कालिन भैय्या गुड्डुचा बदला घेणार का?, 'मिर्झापूर' चा तिसरा सीझन लवकरच येणार...

आतापर्यंत या वेबसीरिजचे दोन भाग आले असून तिसरा भाग कधी येणार असा सर्वांनाच प्रश्न पडला होता.

Chetan Bodke

Mirzapur Season 3: सध्या प्रेक्षकांचा वेबसीरिज पाहण्याचा कल सर्वाधिक वाढला आहे. अनेक वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. त्यातीलच एक वेबसीरिज म्हणजे मिर्झापूर. मिर्झापूर या वेबसीरिजचा चाहतावर्ग देखील बराच मोठा आहे. आतापर्यंत या वेबसीरिजचे दोन भाग आले असून तिसरा भाग कधी येणार असा सर्वांनाच प्रश्न पडला होता. लवकरच आता या वेबसीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दुसऱ्या सीझनने चाहत्यांना कथेच्या मध्यभागी सोडले आणि त्यांना आश्चर्यचकित केल्याने या सीरिजच्या तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षक फारच उत्सुक असल्याचं दिसत आहे. आता तिसऱ्या भागात काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. कालीन भैय्या त्याच्या मुलाच्या खुनाचा बदला घेणार की गुड्डू भैय्या हाच ‘मिर्झापूर’चा राजा होणार? याविषयी सर्वांनाच कमालीची उत्सुकता आहे. प्रेक्षक आगामी भागात काय होणार या विषयी आपले वेगवेगळे अंदाज बांधत आहे.

नेमकं ‘मिर्झापूर’वर आता कोणाचं वर्चस्व असणार प्रेक्षक हे सर्व जाणून घेण्यासाठी फारच उत्सुक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या वेबसीरिजचे शूटिंग संपले असून सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे.

त्यामुळे या वेबसीरिजचे निर्माते आणि प्राइम व्हिडिओ लवकरच या तिसऱ्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. हा तिसरा सीझनसुद्धा अॅक्शन आणि ड्रामाने भरलेला असेल. यासोबतच सीरिजमध्ये काही जुनी कॅरेक्टरही प्रकाशझोतात येण्याची शक्यता आहे.

या वेबसीरिजचे चाहते बरेच असले तरी, तिसऱ्या सीझनवर बंदी घालण्याची याचिका मध्यंतरी न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायलयाने तिसऱ्या सीझनला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

या वेबसीरिजमधील चित्रित दृश्य, भाषा यामुळे तिसऱ्या सीझनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. मिर्झापूर येथील एका रहिवाश्यानेच ही याचिका दाखल केल्याचं स्पष्ट झालं होतं. पंकज त्रिपाठी, अली फझल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल यांसारख्या कलाकारांनी या वेबसीरिजमध्ये उत्तम काम केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Road Accident : ४८ तासांत 3 मोठे अपघात, 53 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Maharashtra Politics: 'मी रमीचा खेळाडू नव्हे, तर...'भाजपमध्ये प्रवेश करताच सांगळेंचा मंत्री कोकाटोंवर घणाघात

Maharashtra Live News Update: कोंढवा गणेश काळे हत्या प्रकरण; सोशल मीडियावर हत्येचं समर्थन करणारा व्हिडिओ पोस्ट

Daya Dongre: चित्रपटात आपला ठसा उमठवणाऱ्या दया डोंगरे निवडणार होत्या 'हे' करिअर; पण झाल्या अजरामर अभिनेत्री

Bihar Election: ऐन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान RJDने आपल्याच उमेदवाराला पक्षातून काढलं? काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT