Priyanka Chopra Name Was Given To Animal Koala In Australia Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra News : अभिमानास्पद ! परदेशात 'देसी गर्ल'चा सन्मान; ऑस्ट्रेलियातील 'या' प्राण्याला प्रियंका चोप्राचं नाव

Priyanka Chopra Name Was Given To Animal Koala In Australia : 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा हिने आपल्या मित्र- मैत्रिणींसोबत ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथील पॅराडाइज कंट्रीला भेट दिली. यावेळी तिथल्या वन अधिकाऱ्यांनी अभिनेत्रीला खास गिफ्ट दिलं आहे.

Chetan Bodke

प्रसिद्ध बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा परदेशात सुट्टीचा आनंदही लुटत आहे आणि शुटिंगचाही आनंद लुटत आहे. प्रियंका सध्या ऑस्ट्रेलियात ‘द ब्लफ’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. अभिनेत्री अनेकदा इन्स्टाग्रामवर सेटवरील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतंच अभिनेत्रीने ऑस्ट्रेलियातील ट्रीप दरम्यानचे काही फोटोज् शेअर केले आहेत. ही ट्रीप ती तिच्या फ्रेंड्ससोबत एन्जॉय करीत आहे. या ट्रीपमध्ये अभिनेत्रीला ऑस्ट्रेलिया सरकारकडून एक खास गिफ्ट मिळालं आहे.

अभिनेत्रीला ऑस्ट्रेलियन सरकारकडून मिळालेले गिफ्ट पाहून भारावली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने एका प्राण्याला चक्क प्रियंकाचं नाव आहे. ‘द ब्लफ’ चित्रपटाच्या शुटिंगमधून वेळ काढून अभिनेत्रीने आणि मित्र मंडळींनी फावला वेळ काढून सुट्टीचा आनंद लुटला. अभिनेत्रीने तिच्या मित्रांसोबत ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथील पॅराडाइज कंट्रीला भेट दिली होती. यावेळी तिचं नाव कोआला प्राण्याला दिलं असल्याची माहिती वन अधिकार्‍यांनी तिला दिली. ही माहिती ऐकून अभिनेत्री आश्चर्यचकित झाली आहे.

८ महिन्यांच्या कोआला प्राण्याला प्रियंकाचं नाव देण्यात आले आहे, अशी माहिती तेथील वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रियंकाने बेबी कोआलासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. "८ महिन्यांच्या कोआला जोईचे नाव माझे नाव देण्यात आले आहे. किती क्युट… या सुंदर भेटीसाठी आणि वन्यजीवांची ओळख करून दिल्याबद्दल पॅराडाईज कंट्रीचे आभार. मीरकाट्स, कोआला, कांगारू, तस्मानियन डेव्हिल आणि डिंगो! ऑस्ट्रेलियातील वन्यजीव राखीव ठेवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या सर्व कामांसाठी धन्यवाद" असं कॅप्शन देत अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT