Instagram @jerryxmimi
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra Viral Video: प्रियांका चोप्राला खरंच या अभिनेत्यानं सगळ्यांसमोर केलं लिपकिस? जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य

Priyanka Chopra at Love Again premiere: लव्ह अगेनच्या प्रीमियरमध्ये सॅम ह्यूगनने प्रियांका चोप्राला किस केलं.

Pooja Dange

Priyanka Chopra-Sam Heugan Video: प्रियांका चोप्रा सध्या खूप व्यस्त आहे. मेट गाला 2023 मध्ये सहभागी झाल्यानंतर ती 'लव्ह अगेन' चित्रपटाच्या प्रीमियर देखील उपस्थित राहिली होती. या चित्रपटामध्ये सॅम ह्यूगन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये प्रियंकाच्या प्रियकराचा मृत्यू झाल्यानंतर तिचा प्रेम शोधण्याचा प्रवास दाखविण्यात आला आहे.

बुधवारी न्यूयॉर्कमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. ज्यात प्रियांका, सॅम आणि निक जोनास उपस्थित होते. या इव्हेंटमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सॅम प्रियांकाच्या नाकाला किस करताना दिसत आहे. पण या व्हिडिओ क्लिपमधील एक फोटो व्हायरल होत आहे, ज्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. सॅमने प्रियांकाच्या ओठांवर किस घेतल्याचे बोलले जात आहे. (Latest Entertainment News)

सॅम ह्यूगन, प्रियांका चोप्रा आणि सेलीन डिऑन स्टारर 'लव्ह अगेन'ची प्रेक्षक वाट पाहत आहेत. नुकताच न्यूयॉर्कमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला. या चित्रपटात सॅम आणि प्रियांकासोबत निकचाही छोटासा कॅमिओ आहे. तिघेही प्रीमियरला उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी प्रियांकाने निळ्या रंगाच्या गाऊनसह पफी स्कर्ट घातला होता. तिच्या ड्रेसवर एक मोठा बोव्ह होता. तिने मोकळे सोडले होते. यादरम्यान सॅम ऑल-ब्लॅक लूकमध्ये हँडसम दिसत होता. तर निक ग्रे रंगाच्या सूटमध्ये आला होता.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सॅम प्रियंकाला भेटण्यासाठी स्टेजवर येतो. तो तिला ग्रिड करण्यासाठी जातो तेव्हा प्रियांका खाली वाकते आणि सॅमचे ओठ प्रियांकाच्या नाकाजवळ येतात.

लव्ह अगेनच्या प्रीमियरमध्ये सॅम ह्यूगनने प्रियांका चोप्राला किस केल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले की, 'मित्रांमध्ये इतके सुंदर किस. चित्रपट पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. एकाने लिहिले की, 'सॅमला प्रियंकाच्या नाकावर किस करताना पाहणं खूप गोड आहे.' पण काही लोकांना ही गोष्ट आवडली नाही.

प्रियांका चोप्रा रिचर्ड मॅडनसोबत 'सिटाडेल'मध्ये प्रमुख भूमिकेत आहे. रुसो ब्रदर्स वेब शोचा प्रीमियर 28 एप्रिल 2023 रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. यात प्रियंका नादिया सिनच्या भूमिकेत आणि रिचर्ड मॅडेन मेसन केनच्या भूमिकेत आहे. बॉलिवूडमध्ये ती 'जी ले जरा'मध्ये आलिया भट आणि कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT