Priyanka chopra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka chopra: 'देसी गर्ल'चे पिंक सिटी जयपूरमध्ये शाही स्वागत; सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना केले खूश

Priyanka chopra: अलिकडेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा जयपूरला पोहोचली, जिथे तिने शाही व्हिला आणि सुंदर वातावरणाचे फोटो शेअर केले. हे पाहून चाहते आनंदी झाले आहेत.

Shruti Vilas Kadam

Priyanka chopra: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नुकतीच जयपूरला गेली होती. जयपूरला प्रियंका व्यावसायिक कामासाठी गेली होती. निसर्ग रम्य वातावरणातील सुंदर फोटो प्रियंकाने सोशल मीडियावर पोस्ट केले असून हे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत.

शाही स्वागताने चाहत्यांची मने जिंकली

अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर जयपूर, राजस्थाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फ्लाइटच्या आतील बाहेरील वातावरणाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, सुंदर जयपूर. याशिवाय त्यांनी शाही व्हिलाचे फोटोही शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती मधुर स्वरात बासरी वाजवताना दिसत आहे. या सुंदर वातावरणात, एका मोराच्या नाचण्याचा व्हिडिओही अभिनेत्रीने शेअर केला आहे.

प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असते

प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचा पती निक जोनास आणि मुलगी मालती यांच्याशी संबंधित पोस्ट शेअर करते. अलिकडेच त्यांनी त्यांची मुलगी मालतीची झोपलेली एक पोस्ट शेअर केली. काही महिन्यांपूर्वीच, अभिनेत्री तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नाला उपस्थित राहिली होती, तिने इंस्टाग्रामवर अनेक सुंदर फोटो शेअर केले होते.

प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल

ही अभिनेत्री तिच्या आगामी 'SSMB 29' चित्रपटात दिसणार आहे, यामध्ये ती महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय प्रियांकाकडे 'द ब्लफ' आणि 'हेड्स ऑफ स्टेट' सारखे चित्रपट आहेत, ज्यांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT