Priyanka Chahar Choudhary Accused Fashion Instagram
मनोरंजन बातम्या

Priyanka Chahar Choudhary: फॅशन करणं प्रियंकाला पडलं महागात; प्रसिद्ध डिझायनरने केला चोरीचा आरोप

‘बिग बॉस 16’ फेम प्रियंका चहर चौधरी सध्या एका फॅशनमुळे कमालीची गोत्यात आली आहे.

Chetan Bodke

Priyanka Chahar Choudhary Accused Fashion: ‘बिग बॉस 16’ फेम प्रियंका चहर चौधरी सध्या कमालीची गोत्यात आली आहे. प्रियांकावर कपडे चोरण्याचा आणि कपड्यांची स्टाईल कॉपी केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. प्रसिद्ध फॅशन डिझाईनर इशिताने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून प्रियांकाने तिचे ब्रँडेड कपडे आणि तिची स्टाईलही कॉपी केल्याचा आरोप केला आहे.

प्रियंका चहर चौधरीने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बेज रंगाचा रफल लेहेंगा परिधान केलेले काही फोटो शेअर केले होते. यानंतर इशिताने दावा केला होता की हे तिच्या ब्रँडचे कपडे असून, जे तिने खास डिझाइन केले होते. यानंतर इशिताने एकामागून एक ट्विट करत प्रियंका चहरवर आरोप केले. (Bollywood News)

फॅशन डिझायनर इशिताने ट्वीट केले होते, ते तिने तिच्या ट्विटर हँडलवरून डिलीट केले आहे. तिने लिहिले की, ‘हिला वाटतं की ही माझ्यासारखं दिसायचा प्रयत्न करेल. किंवा माझ्यासारखे कपडे घालेल. हो पण कदाचित एक अब्ज पुनर्जन्मानंतर. 30 हजार पाऊंडचे माझे कपडे चोरले आणि मी त्यावर काहीच बोलले नाही.’

इशिताचे डिलीट केलेल्या दोन ट्वीटमधलं तिचं हे दुसरं ट्वीट आहे, त्यात ती म्हणते, ‘एका सायकेटिक पीआर टीमसोबत एक ओबसेस्ड लेडी आहे. जी इतरांना त्रास देणं बंद करू शकत नाही. लोकांना इम्प्रेस करण्यासाठी एक बनावट व्यक्तिमत्व बनवले आहे.’

(Bollywood Actress)

सोबतच इशिताचे आणखी दोन ट्वीट देखील बरेच व्हायरल होत आहेत. त्या ट्वीटमध्ये ती म्हणते. “ आणि माझे कपडे चोरीला गेले आहेत. मी त्याच्यावर आरोपांची धूळफेक केली, पण त्याचा शत्रू कोण आहे हे माहित नाही. त्यावर मी आता भाष्य करणार नाही. जर ती मला ब्लॉक करत माझी फॅशन कॉपी करत फोटो शेअर करते, तर ती तिची समस्या आहे. असे दिसते की तिचे आधीच बरेच शत्रू आहेत.”

वरील ट्वीटला रिट्वीट करत प्रियंका म्हणते, “जर माझ्याकडे मागितलं असतं तर मी दिलं असतं. मात्र मार्केटिंगची ही योग्य पद्धत नाही. स्वत:च्या बळावर मार्केटिंग करा. मला अशा अडाणी लोकांसोबत राहण्याची बिल्कुल इच्छा नाही.” दरम्यान, इशिताने प्रियांकावर गुन्हा दाखल केल्याची चर्चा आहे. इशिताने स्पष्ट केले आहे की, सध्या प्रियंका देशाबाहेर असल्याने तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही, मात्र ती परतल्यानंतर तिच्यावर इशिता गुन्हा दाखल करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT