मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अभिनेत्रीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तमिळ आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री प्रिया भवानी शंकर हिने बॉयफ्रेंड राजवेल राजसोबत लग्न बंधनात अडकली आहे. हा एक खाजगी विवाह सोहळा होता. या सोहळ्याला त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
अभिनेत्री प्रिया भवानी शंकरने बुधवारी ११ नोव्हेंबर रोजी अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. लग्नासाठी प्रियाने लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे, तर राजवेलने फुलांची नक्षी असलेला पांढरा कुर्ता घातला आहे. दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत आहे.अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
अभिनेत्रीने फोटो शेअर करताना लिहिलं की, "तर, हे घडले! ११.११.२०२६" अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते आणि कलाकार मंडळी भरभरून कमेंट्स करून दोघांना शुभेच्छा देत आहेत. दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हा विवाह सोहळा चेन्नईत पार पडला.
प्रिया भवानी शंकर ही साऊथचा प्रसिद्ध चेहरा आहे. प्रिया अनेक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांचा भाग राहिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अलीकडेच ती 'इरुमुडी' (Irumudi) या तेलुगू चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये रवी तेजा मुख्य भूमिकेत आहे. ही अभिनेत्री आता दिग्दर्शक अजय ज्ञानमुथू यांच्या 'डिमाँटे कॉलनी ३' (Demonte Colony 3) या हॉरर-थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. अरुलनिथी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पुढील वर्षी पोंगलच्या काळात प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.