Bin Lagnachi Goshta Saam Tv
मनोरंजन बातम्या

गहीर प्रेम व्यक्त करणारं 'मला तू, तुला मी' गाणं प्रदर्शित; 'बिन लग्नाची गोष्ट'मध्ये झळकणार प्रिया- उमेशची रोमँटिक केमिस्ट्री

Bin Lagnachi Goshta: आजच्या नाते संबंधावर भाष्य करणाऱ्या ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटातील 'मला तू, तुला मी' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून प्रेम आणि नात्यांची एक वेगळी, सजीव भावना यातून साकारली गेली आहे.

Shruti Vilas Kadam

Bin Lagnachi Goshta: आजच्या नाते संबंधावर भाष्य करणाऱ्या ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटातील 'मला तू, तुला मी' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून प्रेम आणि नात्यांची एक वेगळी, सजीव भावना यातून साकारली गेली आहे. या गाण्यातून एकमेकांबद्दल असलेलं निस्सीम प्रेम प्रकट होतं. कोणत्याही चौकटीत न अडकलेलं हे प्रेम मग ते कोणत्याही नात्याबद्दलचे असो. या गाण्याचे शब्द नात्यांमध्ये असलेल्या अबोल, तरीही ठाम भावनांना शब्दरूप देतात.

पारंपरिक चौकटींपेक्षा वेगळ्या नात्यांची ही अनुभूती नात्यांवर नव्याने विचार करायला लावणारी आहे. हृषीकेश कामेरकर, संज्योती जगदाळे यांनी गायलेल्या या गीताला वैभव जोशी यांच्या शब्दांनी आणि अजित परब यांच्या संगीताने अधिकच गहिरेपण प्राप्त केलं आहे. गाण्याच्या चालीत आणि शब्दांत एक शांत भावना आहे, जी प्रेक्षकांच्या मनाच्या खोलवर जाणारी आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे या गाण्याबद्दल म्हणतात, ''हे गाणं म्हणजे फक्त दोन पात्रांमधलं प्रेम नाही, तर एकमेकांना स्वीकारण्याची भावना आहे. 'मला तू, तुला मी' ही ओळ म्हणजे कोणतीही नात्याची बंधनं नसतानाही एकमेकांत असलेली दृढ भावना सांगणारी आहे.''

बिन लग्नाची गोष्ट’ १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT