Preity Zinta Shares Photos Of Her Kids Saam Tv
मनोरंजन बातम्या

Preity Zinta Shares Photos Of Her Kids : प्रीती झिंटाच्या जुळ्या मुलांचे क्युट फोटो; परदेशात राहूनही भारतीय संस्कृतीचं जतन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Preity Pens Note For Her Kids : प्रीती झिंटाने ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले होते. काही काळापासून प्रीती चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. प्रीती ही तिच्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त आहे.नुकतेच प्रीतीने मुलांच्या मुंडन समारंभाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रीती झिंटाने जीन गुडइनफ याच्याशी २०१६ मध्ये लॉस एन्जेल्स येथे लग्नगाठ बांधली.प्रीती झिंटाने सेरोगसीच्या माध्यमातून २०२१ मध्ये जुळ्या मुलांची आई बनली. प्रीतीने जिया आणि जय या जुळ्या मुलांना जन्म दिला. प्रीती नेहमीच तिच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर करत असते. नुकतेच प्रीतीने तिच्या मुलांच्या मुंडन संमारंभानंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Latest Entertainment News In Marathi)

या फोटोत तिच्या दोन्ही मुलांचे टक्कल केल्याचे दिसत आहे. 'अखेर या वीकेंडला मुंडन सोहळा पार पडला.हिंदू धर्मात मुलांचे केस कापणे हे शुद्धीकरण समजले जाते. पूर्वीच्या जन्मापासून मुक्ती मिळण्यासाठी हे केले जाते. त्यामुळे आम्हीही जिया आणि जय यांचे मुंडन केले आहे'.असे कॅप्शनही दिले आहे.

प्रीती झिंटा ही सध्या परदेशात तिच्या कुटुंबासोबत राहत आहे. परदेशात राहूनही हिंदू संस्कृती जपणाऱ्या प्रीतीचे सोशल मीडियावर खूप कौतुक होताना दिसत आहे. प्रीतीच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

प्रीती झिंटा ही अभिनेत्रीसोबतच बिझनेस वूमन आहे. प्रीतीची स्वतः च प्रोडक्शन हाउस आहे. त्याचबरोबर प्रीती ही 'पंजाब किंग्स' या आयपीएल संघाची सहमालक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT