'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज झाला.
'देऊळ बंद २' चित्रपट प्रवीण तरडे दिग्दर्शित आहे.
'देऊळ बंद २' शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे.
सध्या सर्वत्र फक्त प्रवीण तरडेंची हवा पाहायला मिळत आहे. 'देऊळ बंद २' रिलीज होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. चित्रपटाने एका आठवड्यात बंपर कमाई केली आहे. 'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे गुरुवारी रिलीज झाला आहे. श्री स्वामी समर्थ यांच्यावरील भक्ती चित्रपटातून दिसत आहे. 'देऊळ बंद २' हा चित्रपट 2015 साली रिलीज झालेल्या प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद' चा सीक्वल आहे. चित्रपटाची आठवड्याभराची कमाई जाणून घेऊयात.
'देऊळ बंद -2' चित्रपटाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे हा आहे. आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही तर बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत बदल केल्याने परिस्थितीत सुधारणा होईल हा महत्त्वाचा संदेश चित्रपटातून देण्यात आला आहे. 'देऊळ बंद -2' या चित्रपटातून होणारी कमाई शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केली.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने ९ व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या शुक्रवारी 1,875 शोमधून 3.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची नऊ दिवसात कमाई ३५ कोटींपार झाली आहे. आता दुसऱ्या वीकेंडला चित्रपट किती कोटी कमावतो, पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दिवस १ - ३.०५ कोटी रुपये
दिवस २ -३.११ कोटी रुपये
दिवस ३ -५.२१ कोटी रुपये
दिवस ४ - ६. १० कोटी रुपये
दिवस ५ - ३. ७० कोटी रुपये
दिवस ६ - ३.३५ कोटी रुपये
दिवस ७ - ३.६० कोटी रुपये
दिवस ८ - ४.५५ कोटी रुपये
८ दिवसांची एकूण एकूण - ३२.८२ कोटी रुपये
'देऊळ बंद -2' मध्ये दिग्दर्शक प्रवीण तरडे देखील झळकले आहेत. तसेच चित्रपटात गश्मीर महाजनीची झलक देखील पाहायला मिळत आहे. 'देऊळ बंद -2'मध्ये मराठी दिग्गज अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत झळकले आहेत. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी श्री स्वामी समर्थांची भूमिका आणि स्नेहल तरडेने महिला शेतकऱ्याची भूमिका साकारली. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. चित्रपटात महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड,रमेश परदेशी,ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, मुकुंद वसुले, अतुल कुदले, अनिरुद्ध दिंडोरकर आणि हिृषीकेश वांबुरकर हे कलाकार झळकले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.