Prathamesh- Kshitija Wedding Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

वरमाला घातल्यानंतर Prathamesh- Kshitija पडले एकमेकांच्या पाया, Video पाहून चाहत्यांनी केलं कौतुक

Prathamesh- Kshitija Video: सोशल मीडियावर प्रथमेश आणि क्षितीजाच्या लग्नासोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Prathamesh- Kshitija Wedding

‘टाईमपास’ फेम दगडू अर्थात प्रथमेश परब नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. सध्या सोशल मीडियावर या कपलच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

प्रथमेश आणि क्षितीजाने मुंबईमध्ये लग्नगाठ बांधली आहे. लग्नसोहळ्यामध्ये, प्रथमेश आणि क्षितीजाच्या कुटुंबीयांसह दोघांच्याही मित्रमंडळींनीही लग्नाला उपस्थिती लावली होती. त्यासोबतच प्रथमेशचे काही सेलिब्रिटी मित्र मंडळीही यावेळी लग्नाला उपस्थित होते.

सध्या सोशल मीडियावर प्रथमेश आणि क्षितीजाच्या लग्नासोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. राजश्री मराठी या युट्यूब चॅनलने नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम चॅनलवर लग्नातील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये ते दोघेही एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहेत. वरमाला घातल्या नंतर या कपलने एकमेकांच्या पाया पडले आहेत. सध्या दोघांच्याही या कृत्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

लग्नाला या कपलने खास मराठमोळा लूक केला होता. प्रथमेशने शेरवानी परिधान केली होती, तर क्षितीजाने मराठमोळी साडी परिधान केली होती. सध्या या कपलच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. प्रथमेश परबने १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी धुमधडाक्यात साखरपुडा केला. मुख्य बाब म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या कपलच्या रिलेशनला तीन वर्षे झाली होती.

दरम्यान, प्रथमेश परब गेल्या काही वर्षांपासून क्षितिजा घोसाळकरला डेट करत आहे. इन्स्टाग्रामवर या दोघांची ओळख झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. क्षितीजा ही एक बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे. तर सोबतच ती फॅशन डिझायनर सुद्धा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

Assembly Election: पक्षाने अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं, आता युगेंद्र; सांगता सभेत शरद पवारांचे आवाहन

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

SCROLL FOR NEXT