Salaar Teaser Shared Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salaar Teaser: प्रभासचा ॲक्शनपॅक अंगावर शहारे आणणारा ‘सालार’चा टीझर प्रदर्शित, उत्कृष्ट अभिनयाने लावले चार चाँद

Prabhas Film Teaser: प्रभासचा आगामी चित्रपट ‘सालार’ चा टीझर आज ६ जुलै रोजी सकाळी ५:१२ मिनिटांनी प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Salaar Teaser Shared: ‘आदिपुरूष’मध्ये मुख्य भूमिकेत असलेला प्रभास सध्या तुफान चर्चेत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलासादायक पाठिंबा जरी दिला असला तरी, चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करू शकलेला नाही. अशातच प्रभासचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच आज सकाळी प्रभासच्या ‘सालार’ चा आज टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Entertainment News in Marathi)

प्रभासचा आगामी चित्रपट ‘सालार’ चा टीझर आज ६ जुलै रोजी सकाळी ५:१२ मिनिटांनी प्रदर्शित झाला आहे. प्रभासच्या ‘सालार’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज ‘सालार’चा ऑफिशीयल टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर टीझरची तुफान चर्चा होत असून अभिनेत्याच्या ढासू ॲक्शनने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. टीझर प्रदर्शित होताच अवघ्या काही तासात यूट्यूबवर या टीझरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये , सुरुवात एका कारवर बसलेल्या माणसापासून होते आणि बरेच जणं त्याच्याकडे रायफल आणि इतर शस्त्रे दाखवतात. तो म्हणतो, “सिंपल इंग्लिश, गोंधळ नको. चित्ता, वाघ, हत्ती हे प्राणी खूपच धोकादायक आहे. पण जुरासिक पार्कमध्ये नाही.” टीझरमध्ये प्रेक्षकांना दमदार ॲक्शन पाहायला मिळणार असून ते रूपेरी पडद्यावर त्याची भव्यता अगदीच उत्तम रित्या प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

प्रभासचा ‘सालार’ हा चित्रपटदेखील केजीएफ प्रमाणेच दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केजीएफचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना यशच्या केजीएफप्रमाणेच प्रभासचा सालारही सुपरहिट असेल अशी आशा आहे...

मोठ्या ब्रेकनंतर, प्रशांत नील यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘सालार’चा पहिला भागाचा बहुप्रतिक्षित सिझलिंग फायर टीझर प्रदर्शित झाला आहे. आपल्या हटक्या विचारांमुळे चर्चेत राहिलेल्या प्रशांत नील यांच्या काहीतरी वेगळ्या विचारामुळे निर्मात्यांनी पहाटे ५:१२ वाजता टीझरची घोषणा करून प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढवला.

‘सालार’ मध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, ईश्वरी राव, जगपती बाबू, श्रिया रेड्डी, टिन्नू आनंद यांच्यासह अन्य कलाकार दिसणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार’ हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबर २०२३ रोजी तेलुगू, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि हिंदीसह या ५ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT