Prasad-Swapnil SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prasad-Swapnil : 'जिलबी'च्या ट्रेलर लाँच वेळी प्रसाद ओकनं केलं स्वप्नील जोशीचं तोंडभरून कौतुक, म्हणाला...

Jilabi Trailer Launch : 'जिलबी' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान प्रसाद ओकने अभिनेता स्वप्नील जोशीचे कौतुक केले. या चित्रपटातून ही भन्नाट जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shreya Maskar

नुकताच 'जिलबी' (Jilabi) सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला आणि या ट्रेलर लाँच वेळी प्रसाद ओक स्वप्नीलच तोंड भरून कौतुक तर केले. पण सोबतीला या दोघांनी एकमेकांबद्दल खास गोष्टी देखील सांगितल्या. जिलबीच्या निमित्ताने स्वप्नील आणि प्रसाद पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

दिग्दर्शक अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak ) स्वप्नील बद्दल बोलताना म्हणाला, " आम्हाला जिलबीच्या निमित्ताने दोघांना स्क्रीन स्पेस शेयर करता आली. आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतोय आणि जिलबी च्या सोबतीने आमच्या अनेक कामाची एकत्र सुरुवात झाली. जिलबी होत असताना आमचं ठरलं की आपण सुशीला सुजीत करतोय म्हणून आमच्यासाठी जिलबी अगदीच खास आहे."

प्रसाद पुढे म्हणाला, "स्वप्नील (Swapnil Joshi) कमालीचा अभिनेता आहे आणि त्याचा सोबत काम करताना देखील तितकीच मज्जा आली. मी सेटवर स्वप्नीलला कायम निरखून बघायचो त्याची काम करण्याची पद्धत काम करण्याचा उत्साह हा सेटवर एक खेळीमेळीच वातावरण निर्माण करणार असायचं. स्वप्नील एक अभिनेता म्हणून उत्तम आहे पण निर्मिती विश्वात तो काहीतरी वेगळं करू पाहतोय आणि येणाऱ्या काळात देखील स्वप्नील उत्तम प्रोजेक्ट्स करेन अशी मला खात्री आहे"

सहकलाकाराकडून मिळणार कौतुक हे प्रत्येक अभिनेत्यासाठी खास असतं यात शंका नाही. जिलबी मध्ये स्वप्नील एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतोय. पण आता ही जिलबी नक्की गोड की गूढ हे चित्रपट गृहात जाऊन बघावं लागणार आहे. 'जिलबी' चित्रपट १७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Maharashtra News Live Update: नंदूरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे धरणांतील पाणीसाठात झपाट्याने घट

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

Genelia Deshmukh Photos: 'माझ्या हृदयाचा ठोका...!' जेनेलियाचे फोटो पाहून रितेश देशमुख झाला 'प्रेमात वेडा', म्हणाला....

Pune Railway Station: स्लिपींग पॉड्स, AC लाउंज, वाय-फाय अन् बरंच काही; पुणे रेल्वे स्टेशनवर फक्त ४० रुपयांत राहायची सोय

SCROLL FOR NEXT