Chik Chik Booboom Boom : नव्या वर्षात स्वप्नील जोशीच्या 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाची धमाल ट्रीट

Chik Chik Booboom Boom New Movie : नववर्षी मराठीतील स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात आदी विनोदवीर प्रेक्षकांसाठी नवा चित्रपट घेऊन येत आहेत.
Swapnil new movie Chik Chik Booboom Boom
Swapnil new movie Chik Chik Booboom BoomPR
Published On

Chik Chik Booboom Boom : सगळीकडे नववर्षाच्या उत्साहाचे वातावरण असताना स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात ही नामवंत कलाकार मंडळी प्रेक्षकांना नववर्षी 'चिकी चिकी बुबूम बुम' म्हणत आपल्याला हसवायला सज्ज झाले आहेत.

या चित्रपटाचे गमतीशीर पोस्टर प्रदर्शित झाले असून यात स्वप्नील जोशीचा हटके लूक दिसतोय तर बाकीचे कलाकार घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत दिसतायेत. त्यामुळे ही भानगड नक्की काय आहे? हे समजायला मार्ग नाही. चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज आणि धमाल मनोरंजनाची ट्रीट देणारा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट येत्या २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.

Swapnil new movie Chik Chik Booboom Boom
2025 Bollywood Movies : सलमान, विकी ते आलिया... २०२५ गाजवण्यासाठी सज्ज, कोण कोणते चित्रपट तिकिटबारवर कल्ला करणार?

चित्रपटाची कथा अजून गुलदस्त्यात असली तरी, भन्नाट कलाकार मंडळींच्या एकत्र येण्याने हास्याचे जबरदस्त स्फोट घडतील हे नक्की. नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे.

Swapnil new movie Chik Chik Booboom Boom
Aishwarya Rai : 'ऐश्वर्या कुठे आहे?'; बच्चन कुटुंबाचा 'तो' फोटो पाहून चाहत्यांच्या मनात पुन्हा शंकेची पाल चुकचुकली!

'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे तर संगीत रोहन रोहन यांचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com