Mahaparinirvaan Film Jay Bhim Song Out Instagram
मनोरंजन बातम्या

Jay Bhim Song: 'महापरिनिर्वाण' चित्रपटातलं पहिलं गाणं रिलीज, शाहीर नंदेश उमप यांच्या आवाजात 'जय भीम' गाणं सजलं

Mahaparinirvaan Film 1st Song Out: टीझर आणि मोशन पोस्टरनंतर आता चाहत्यांच्या भेटीला चित्रपटातील पहिलं वहिलं गाणं रिलीज झालेलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देणारं 'जय भीम' हे चैतन्यमयी गाणे प्रदर्शित झाले आहे.

Chetan Bodke

Mahaparinirvaan Film Jay Bhim Song Released

शोषित- वंचितांच्या हक्कासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाने अवघा देश हळहळला होता. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून सर्वच शोकसागरात बुडालेले. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेला लाखोचा जनसमुदाय आला होता. या सगळ्या प्रसंगांचे एकमेव साक्षीदार होते फोटोग्राफर नामदेवराव व्हटकर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अखेरचा प्रवास आपल्या कॅमेरात टिपणाऱ्या नामदेवराव व्हटकर यांचा जीवनप्रवास येत्या ६ डिसेंबर २०२४ ला रिलीज होणार आहे. टीझर आणि मोशन पोस्टरनंतर आता चाहत्यांच्या भेटीला चित्रपटातील पहिलं वहिलं गाणं रिलीज झालेलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देणारं 'जय भीम' हे चैतन्यमयी गाणे प्रदर्शित झाले आहे.

शैलेंद्र बागडे दिग्दर्शित 'महापरिनिर्वाण' चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबर २०२४ रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असताना चित्रपटाच्या निर्मात्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी 'जय भीम' हे चैतन्यमयी गाणे प्रदर्शित झाले आहे. आशिष ढोले यांची संकल्पना आणि अमोल कदम यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला रोहन -रोहन यांचे संगीत लाभले असून हे जबरदस्त गाण्याला नंदेश उमप यांचा भारदस्त आवाज लाभला आहे.

उत्साहाने आणि उल्हासाने भरलेल्या या गाण्यात एक अभिमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व या गाण्यातून अधोरेखित होत असून अतिशय जोशपूर्ण आहे. गाणं अवघ्या काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे.

गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता प्रसाद ओक, गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत , विजय निकम , हेमल इंगळे आणि कुणाल मेश्राम ही स्टारकास्ट दिसणार आहे.

कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म प्रोडक्शन निर्मित 'महापरिनिर्वाण' या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेंद्र बागडे यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके आहेत, तर सहनिर्माते आशिष ढोले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT