Prajakta Mali  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali: प्राजक्तकुंजला २ वर्षे पूर्ण! प्राजक्ताने संपूर्ण परिवारासोबत केलं सेलिब्रेशन; Video पाहाच

Prajakta Mali Shared Post On Social Media: सोशल मीडियावर प्राजक्ता माळी तिच्या चाहत्यांना स्वत:विषयीच्या अपडेट देत असते. नुकतेच प्राजक्ताने खास पोस्ट शेअर केली आहे जी लक्ष वेधून घेणार आहे.

Manasvi Choudhary

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. प्राजक्ताचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता माळी तिच्या चाहत्यांना स्वत:विषयीच्या अपडेट देत असते. नुकतेच प्राजक्ताने खास पोस्ट शेअर केली आहे जी लक्ष वेधून घेणार आहे. (entertainment news)

अभिनेत्री प्राजक्ता माळी सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे. प्राजक्ता केवळ अभिनयच नाही तर निर्माती, बिझनेसवूमन, नृत्यागंणा देखील आहे. प्राजक्ताने आजवर अनेक कलागुणांनी यश संपादन केले आहे. अशातच नुकतंच प्राजक्ताने सोशल मीडियावर सेलिब्रेशनची पोस्ट शेअर केली आहे. संपूर्ण परिवारासह तिने प्राजक्तकुंज नावाचा केक कापून हे सेलीब्रेशन केलं आहे. संपूर्ण आनंदी वातावरणात सर्वचजण सेलीब्रेशन करताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, आम्हा संपूर्ण परिवाराला भेटण्यासाठी, आनंद साजरा करण्यासाठी कोणतेही कारण लागत नाही... हेच कारण आहे... पुढे तिने, फिल्मफेअर, पार्टी, कुंज, २ वर्ष हे हॅशटॅग दिले आहेत.

प्राजक्तकुंज काय आहे?

प्राजक्तकुंज हे प्राजक्ताच्या फॉर्महाऊसचं नाव आहे. प्राजक्ताने मुंबईच्या कर्जत येथे अलिशान फॉर्महाऊस घेतलं आहे. प्राजक्ताने फॉर्महाऊसला २ वर्षे पूर्ण झाली असल्याची माहिती दिली आहे. याचं तिने सेलिब्रेशन देखील केलं आहे. प्राजक्ताच्या फॉर्महाऊसवर राहण्याची उत्तम सोय आहे. येथे तुम्ही पिकनीक प्लान देखील करू शकता. प्राजक्ताच्या फॉर्महाऊसवर एक दिवस राहण्याचा खर्च १५ ते ३० हजार रूपये आहे. कर्जतमध्ये निसर्गाच्या कुशीत असलेल्या या फॉर्महाऊसबाहेर मोठे मोठे धबधब्याचं दृश्य देखील दिसते.

भर मंडपात नवरीला उचलून नवरदेवाचा भन्नाट डान्स; VIDEO VIRAL

धक्कादायक! कसारा स्थानकात रेल्वेच्या टीसीकडून चिमुरडीचा विनयभंग, आईची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Income Tax Return: आता आयटीआर फाइल केल्यावर रिफंड कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गावरून गांजाची तस्करी, नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

Dhanalakshmi Rajyog: 30 वर्षांनंतर शनीदेव होणार मार्गी; नव्या नोकरीसोबत या राशींना मिळणार धनलाभ

SCROLL FOR NEXT