prajakta mali  intagram @prajakta_official
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : प्राजक्ता माळीची इच्छा हटके; मग काय चर्चा होणारच...व्हिडिओ झाला व्हायरल

प्राजक्ता माळीने अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने एक तिची इच्छा व्यक्त केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali )सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहणारी प्राजक्तानं नुकतीच एक पोस्ट केली आहे. जी चाहत्यांचे लक्ष वेधते आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.प्राजक्ता माळी लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे. यासह सोशल मीडियावर अॅक्टिव्ह प्राजक्ताचे दैनदिंन जीवनातील बदल या विषयीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. 'जुळून येती रेशीमगाठी', 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' या तिच्या प्रसिध्द मालिकेतील अभिनय आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. आता चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्राजक्ता माळी लंडनला आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे.

प्राजक्ता माळीने अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. अलीकडेच एका पोस्टमध्ये तिने तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी लंडनवारी करत असल्याचे स्पष्ट केले आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ पोस्ट केली आहे. कॅप्शनमध्ये प्राजक्ताने लंडन वारी घडविल्याचे आभार मानले आहेत. यासह तिने जगच काय, चंद्र- मंगळ, अंतराळसुद्धा बघायचे आहे. अशी इच्छा व्यक्त केली आहे. प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या व्हिडिओवरील आशय चर्चेचा विषय ठरला आहे.

प्राजक्ता माळीने व्हिडिओमध्ये लंडनमधील विविध पर्यटन स्थळाना भेटी दिल्याचे तीचे फोटो शेअर केले आहेत. लंडन चित्रपटाच्या शुटिंगसाठी गेलेल्या प्राजक्ताने चित्रपटाचे नाव व त्यातील कलाकार याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे आगामी कोणत्या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी झळकणार आहे. हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र आल्याने मविआवर परिणाम होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Aishwarya Rai-Salman Khan Breakup : "तो भिंतीवर डोके आपटायचा..." लोकप्रिय दिग्दर्शकाचं ऐश्वर्या-सलमानच्या नात्यावर विधान

चकमकीत आरोपीकडून पोलिसांवर हल्ला, गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू, हल्लेखोराला संपवलं

Mumbai Mayor : खान की मराठी, मुंबईचा महापौर कोण? राजकारण पेटलं, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद, काय बोलणार?

SCROLL FOR NEXT