Shehnaaz Gill : शहनाज गिलने नक्की कोणाचा हात धरला ? व्हिडिओ पाहून चाहते गोंधळात

नुकताच शहनाज गिलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका व्यक्तीचा हात धरताना दिसत आहे. शहनाजच्या या व्हिडिओवर लोकांच्या कमेंट्स येत आहेत.
shehnaaz gill
shehnaaz gillinstagram
Published On

मुंबई : 'बिग बॉस'(Bigg Boss)मधून घराघरात आपली ओळख निर्माण करणारी शहनाज गिल (shehnaaz gill) सध्या खूप चर्चेत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ दररोज व्ह्यराल होतं असतात. शहनाज गिलने काळानुसार स्वत:मध्ये अनेक बदल केले आणि मनोरंजन विश्वातही स्वत:चे स्थान निर्माण केले. लवकरच ती चित्रपटांमध्येही झळकणार आहे. दरम्यान, शहनाजचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका व्यक्तीचा हात धरून चालताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेहनाजचे चाहते अनेक कमेंट करत आहेत.

shehnaaz gill
Koffee With Karan 7: सध्या रिलेशनशिप...... ,होस्ट करण जोहरने रिलेशनशिपच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरानं रंगतेय चर्चा!

शहनाज गिल कधी तिच्या गाण्यांमुळे तर कधी तिच्या लूकमुळे चर्चेत असते. सध्या शहनाजच्या बॉलिवूड डेब्यूची जोरदार चर्चा आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शहनाज प्रसिद्ध पंजाबी गायक जस्सी गिलसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिने जस्सीचा हात पकडल्याचे दिसत आहे.

shehnaaz gill
VIDEO: लहान मुलीचा 'सामी-सामी'वर अफलातून डान्स; पुष्पाच्या श्रीवल्लीलाही मग राहावलं नाही!

हा व्हिडिओ अभिनेता सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या पार्टीचा आहे. लवकरच तो बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शहनाजचीही भूमिका आहे. व्हिडिओमध्ये शहनाजने डेनिम जॅकेट आणि जीन्स घातले आहे. तसेच तिने कॉर्सेट टॉप घातला होता. या लूकमध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

त्याचबरोबर जस्सी गिलचा लूकही लोकांना आवडला आहे. त्याने हिरवा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली आहे. जेव्हापासून या दोघांचा एकत्र व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तेव्हापासून या दोघांची जोडी चांगलीच दिसत आहे. अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दोघेही म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com