Krishnam Raju Saam Tv
मनोरंजन बातम्या

RIP Krishnam Raju: बाहुबलीवर दुःखाचा डोंगर; सुपरस्टार प्रभासचे काका कृष्णम राजू यांचे निधन

प्रभासचे ते काका उप्पलती कृष्णम राजू यांनी आज म्हणजे ११ सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील रिबेल स्टार म्हणून प्रसिद्ध असलेले तसेच 'बाहूबली' स्टार प्रभासचे(Prabhas) ते काका उप्पलती कृष्णम राजू(Krishnam Raju) यांनी आज म्हणजे ११ सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आरोग्याच्या समस्येने त्रस्त होते. त्यांच्या अचानक निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी पाच दशके टोलिवूड इंडस्ट्रीवर राज्य केले आणि १८७ हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. उप्पलती कृष्णम राजू शेवटचे पुतण्या प्रभाससोबत 'राधे श्याम' चित्रपटात दिसले होते.

कृष्णम राजू यांचा जन्म २० जानेवारी १९४० मध्ये आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील मोगलथुर येथे झाला होता. त्यांनी आपल्या सिनेसृष्टीतील कारकिर्दित १८७ चित्रपटात काम केले आहे. त्यांनी 'चिलाका गोरिंका' या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. कृष्णम राजू यांनी पदार्पणामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी 'नंदी पुरस्कार' मिळाला असून त्यांना साऊथ इंडस्ट्रीमध्ये ५ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. सोबतच त्यांनी ३ राज्य नंदी पुरस्कारावर आपले नाव कोरले.

अभिनयानंतर कृष्णम राजू राजकारणात सक्रिय होते. त्यांनी १९९० मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नंतर त्यांनी काकीनाडा नरसापूरम या मतदार संघातून निवडणूक लढवली आणि ते अनुक्रमे निवडूनही आले. विशेष म्हणजे १९९९ ते २००४ या कालावधीत तिसऱ्या वाजपेयी मंत्रीमंडळात परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री पद त्यांनी भूषवले होते. २००९ मध्ये त्यांनी चिरंजीवींनी स्थापन केलेल्या 'प्रजाराज्यम' या पक्षात प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

SCROLL FOR NEXT