Pawan Singh Saam tv
मनोरंजन बातम्या

Pawan Singh: प्रसिद्ध अभिनेत्याच्या इव्हेंटमध्ये गोंधळ; पोलिसांचा चाहत्यांवर लाठीचार्ज, VIDEO व्हायरल

Pawan Singh: उत्तर प्रदेशातील बलिया येथे पावर स्टार पवन सिंह यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. अनियंत्रित जमावामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असून अनेक चाहते जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Shruti Vilas Kadam

Pawan Singh: भोजपुरी चित्रपटसृष्टीतील ‘पॉवर स्टार’ म्हणून ओळखले जाणारे पवन सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उत्तर प्रदेशातील बलिया येथे आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या एका कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. कार्यक्रमादरम्यान चाहत्यांची प्रचंड गर्दी झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बलिया येथे आयोजित कार्यक्रमात पवन सिंह आपल्या लोकप्रिय गाण्यांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. त्यांना पाहण्यासाठी हजारो चाहते उपस्थित होते. मात्र, कार्यक्रम सुरू असतानाच चाहत्यांनी मंचाच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ निर्माण झाला. काही वेळातच परिस्थिती इतकी बिघडली की कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली.

गोंधळादरम्यान अनेक खुर्च्या आणि टेबलांची तोडफोड झाल्याचेही समोर आले आहे. वाढता जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या कारवाईत काही चाहते जखमी झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला अभिनेता आणि खासदार रवी किशन तसेच उत्तर प्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंग देखील उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती.

लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या सचिन कुमार नावाच्या तरुणाने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, तो शांतपणे कार्यक्रम पाहत उभा होता. कोणतीही गडबड न करता चार पोलिसांनी त्याला पकडले आणि मारहाण केली. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गोंधळाचे भयावह चित्र दिसत आहे. काही जखमींच्या अंगातून रक्त वाहताना दिसत आहे. या घटनेनंतर कार्यक्रमांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Maharashtra News Live Update: मध्य रात्री मुंबई पुणे हायवेवर मोठी वाहतूक कोंडी

Dangerous Fort : उभ्या कातळ पायऱ्या अन् दोन्ही बाजूंना खोल दरी! 'या' किल्ल्याची चढाई पाहूनच उडेल धडकी

Tharala Tar Mag : गरोदर सायली बनली लेडी सिंघम, अर्जुनसोबत सिक्रेट मिशनला सुरुवात, 'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट | VIDEO

High cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे तेलकट पदार्थांपेक्षा ही 1 चूक ठरतेय कारणीभूत, हृदयाच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी लक्ष द्या, डॉक्टरांचा इशारा

Low Blood Sugar Signs And Symptosm: थकवा, घाम अन् अचानक भूक लागणे? शरीरातील साखर कमी झाल्यास दिसतात ही लक्षणं

SCROLL FOR NEXT