Low Blood Sugar Signs And Symptosm: थकवा, घाम अन् अचानक भूक लागणे? शरीरातील साखर कमी झाल्यास दिसतात ही लक्षणं

Manasvi Choudhary

शरीरात साखरेची कमतरता

रक्तातील ग्लुकोजची पातळी खूप कमी झाल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसतात हे तुम्हाला माहित आहे का?

Low Blood Sugar Signs And Symptosm

कधी घ्यावी काळजी?

डायबिटीजच्या रूग्णांना खालील लक्षणे वारंवार दिसत असतील तर डॉक्टराची भेट घ्यावी.

Low Blood Sugar Signs And Symptosm

थकवा येतो

शरीराला ऊर्जा पुरवणारी ग्लुकोजची पातळी अचानक घटल्याने अगदी साधे काम करतानाही प्रचंड थकवा जाणवतो आणि अंगात अजिबात ताण राहत नाही.

Weakness | pinterest

चक्कर येते

मेंदूला पुरेसा ग्लुकोजचा पुरवठा न झाल्यामुळे चक्कर आल्यासारखे वाटते, डोळे अंधुक होतात किंवा तोल गेल्यासारखा होतो.

Low Blood Sugar Signs And Symptosm | canva

हात थरथरणे

कोणत्याही कारणाशिवाय अचानक शरीराला कंप सुटणे, हात थरथरणे आणि अंगातून थंड घाम सुटणे हे लो ब्लड शुगरचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते.

Low Blood Sugar Signs And Symptosm | Canva

प्रचंड भूक लागणे

अचानक पोटात कावळे ओरडल्यासारखी तीव्र भूक लागणे, पोटात अस्वस्थ वाटणे किंवा मळमळल्यासारखे होणे असा त्रास होतो.

Low Blood Sugar Signs And Symptosm | Canva

चिडचिड होते

साखरेची पातळी लो झाल्यावर मेंदूवर ताण येतो, ज्यामुळे व्यक्ती विनाकारण चिडचिड करू शकते, गोंधळल्यासारखे वाटते किंवा नैराश्य जाणवू शकते.

Stress | pinterest

छातीची धडधड वाढणे

छातीमध्ये धडधड वाढणे किंवा हृदयाचे ठोके वेगाने पडल्यासारखे जाणवणे हे देखील साखरेचे प्रमाण घटल्याचे संकेत आहेत.

Chest Pain Sign

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: Private Part Hygiene Tips: प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका! ‘या’ ५ गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या

Private Part Hygiene Tips
येथे क्लिक करा...